मुंबई, 11 जानेवारी - ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत (Rekha Kamat) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 89 वर्षी त्यांनी (Rekha Kamat passes away) मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गतकाळातल्या मराठी मराठी चित्रपटातल्या फेव्हरेट नायिका आणि अलिकडच्या काळातल्या मराठी मालिकांमधल्या लाडक्या आज्जींपर्यंत अनेक भूमिका साकारलेल्या रेखा कामत वयाची ऐंशी पार करूनही कार्यरत होत्या. मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ मानला गेलेल्या संगीत नाटकांपासून ते राजा परांजपे, राजा गोसावी अशा दिग्गजांनी गाजवलेल्या रुपेरी पडद्यावरच्या गाजलेल्या चित्रपटांपर्यंत रेखा या नायिकेच्या रूपाने वावरल्या. राजा गोसावी-राजा परांजपे यांचा गाजलेला लाखाची गोष्ट हा रेखा कामत यांचा नायिका म्हणून पहिला सिनेमा. तो 1952 साली प्रदर्शित झाला होता. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी अभिनेत्री म्हणून त्या वेळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. या दोघींनी लाखाची गोष्ट या चित्रपटात एकत्रित काम केले होते. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुखटणकर होय. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पाहिल्यानंतर उतारवयातही त्यांनी अभिनय करणं सुरू ठेवलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. काही वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती. ‘आजी’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट आहे. वाचा- मराठी कलाविश्वात कोरोनाचा कहर! जितेंद्र जोशीसह या सेलेब्सना झाला कोरोना रेखा कामत यांची प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही पहिली मालिका होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले होते. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख या मालिकेमुळे त्यांना मिळाली होती. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ साकारली होती. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते. रोज नवा ‘प्रयोग’ आणि प्रेक्षकांची मिळणारी थेट दाद यामुळे नाटक त्यांच्या विशेष आवडीचे होते. ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात त्यांची दुहेरी भूमिका होती), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
‘आई कुठे काय करते’च्या सेटवर सर्वांची करावी लागली कोरोना टेस्ट; मुख्य अभिनेत्रीच आली पॉझिटिव्ह‘नेताजी पालकर’ चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली होती. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित ‘यातनाघर’ तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या प्रायोगिक नाटकातही काम केले होते. त्यांनी आजवर केलेल्या या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.