Home /News /entertainment /

Breaking: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

Breaking: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 11 जानेवारी-   प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या त्या 92  वर्षांच्या आहेत.आमचे प्रतिनिधी मिहीर त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु घाबरण्याचं कारण नाही त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्या रुग्णालयातही राहू शकतात, किंवा त्या घरातसुद्धा राहून यावर उपचार घेऊ शकतात. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत 'लता मंगेशकर यांना लवकर आराम वाटावा अशी प्रार्थना केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या- मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्यामुळे निर्बंध लागले आहे. तीन दिवसांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या 20 हजारांच्या पुढे पोहोचली होती.पण काल रुग्ण संख्या कमी झाली होती.मागील तीन दिवसांत मुंबईत 25 हजाराहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली होती. पण काल ती 13 हजारांवर घसरली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या