मुंबई, 21 नोव्हेंबर : मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं वयाच्या 58 व्या वर्षी (madhavi gogate) निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात (madhavi gogate passes away) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, माधवी यांच्या पश्चात त्यांचे पती आणि विवाहित मुलगी असल्याचं सांगण्यात येतं. मराठीसोबत हिंदीमध्ये देखील सोडली अभिनयाची छाप माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत अभिनय केला आहे. वाचा : झी मराठीवर लवकरच सुरू होणार नवा शो ‘किचन कल्लाकार’ ; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत ‘गेला माधव कुणीकडे’ हे त्यांचं नाटकं तुफान गाजले माधवी यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. यासोबतच त्यांची ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.