मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

झी मराठीवर लवकरच सुरू होणार नवा शो 'किचन कल्लाकार' ; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत

झी मराठीवर लवकरच सुरू होणार नवा शो 'किचन कल्लाकार' ; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत

झी मराठीवर (Zee Marathi )लवकरच एक किचनशी संबंधीत असा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचं नाव 'किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) असं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 21 नोव्हेंबर: झी मराठीवर (Zee Marathi )लवकरच एक किचनशी संबंधीत असा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचं नाव 'किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) असं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade ) करताना दिसणार आहे.

झी मराठीने नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तरच एकच दिसत आहे की, हा कार्यक्रम किचनशी संबंधीत आहे. त्यामुळे हा कुकींशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र संकर्षणला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

वाचा :‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ, पाहा PHOTO

आता हा कार्यक्रम कधी आणि केव्हा सुरू होणार याबद्दल कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. आठवड्यातून किती दिवस हा कार्यक्रम असणार याची देखील माहिती समोर आलेली नाही. यासोबत मिळालेल्या माहितीनुसार झी मराठीवरील ती परत आलीये ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या जागी देवमाणूस या मालिकेचा दुसरा भाग दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर अद्याप आलेली नाही.

संकर्षण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून उत्तम लेखक व कवीदेखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.सध्या संकर्षण झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे. यासोबतच त्याच्या नाटकाचे देखील प्रयोग सुरू झाले आहेत. आता प्रेक्षक त्याला या नव्या भूमिकेत आणि नव्या कार्यक्रमात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial