मुंबई, 13 जून : मागील काही दिवसात साऊथ सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे जग सोडून जात आहेत. नुकताच एका रस्ते अपघातात असुरन फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या दु:खातून साऊथ इंडस्ट्री बाहेर येत नाही तोवर आता प्रसिद्ध अभिनेते कजान खान यांचंही निधन झालं आहे. प्रोडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्यूसर एनएम बदूशा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट शेअर करत कजान खान यांच्या निधनाची माहिती दिली. कजान खान हे मल्याळम सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी साकारलेल्या विलनच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. अशा हरहुन्नरी अभिनेत्याचं 12 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं साऊथ सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. कजान खान यांनी 1992मध्ये Senthamizh Paattu या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘सेतुपती आयपीएस’, ‘कलाईगनान’, ‘मुरई मामन’ आणि ‘करूप्पा नीला’ सारख्या सिनेमात काम केलं. कजान खान यांनी तमिळ आणि मल्याळम भाषेतील 50 हून अधिक सिनेमात काम केलं. हेही वाचा -
Rubina Dilaik : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला अपघात; नवऱ्यानं गाडीचे फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट
कजान खान हे खास करून त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे ओळखले गेले. त्यांनी साकारलेल्या विलनचा भयंकर अवतार आणि त्यांचे एक्सप्रेशन पाहून प्रेक्षकही घाबरायचे. विलनच्या भूमिका करून देखील कजान खान यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
कजान खान यांनी 1995मध्ये मल्याळम सिनेमात पदार्पण केलं. त्यांनी मामूट्टीच्या द किंगमध्ये साकारलेल्या विक्रम घोरपडेंच्या भूमिकेमुळे सिनेमा तर हिट ठरलाच पण कजान खान यांना देखील नवी ओळख मिळाली. 2015मध्ये कजान खान यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला. लैला ओ लैला असं त्यांच्या शेवटच्या सिनेमाचं नाव आहे. त्यानंतर ते सिनेसृष्टीपासून दूर झाले आणि आज या जगालाही त्यांनी अलविदा म्हटलं. साऊथ सिनेसृष्टीत मागील काही महिन्यात अनेक कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. अभिनेता कजान खान यांच्याआधी नितिन गोपी, नंदामुरी तारक रत्न, कन्नड अभिनेता लक्ष्मण, पुनीत राजकुमार, अभिनेता विवेक, चिरंजीवी सरजा, आरती अग्रवाल या कलाकारांनी हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली एक्झिट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.