मुंबई, 19 जानेवारी- बॉक्स ऑफिसवर सध्या कोणताही हिंदी-दाक्षिणात्य सिनेमा नव्हे तर मराठी सिनेमा धुमाकूळ माजवत आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा सध्या तुफान लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेत आहेत. या मराठमोळ्या जोडीला सध्या प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. शिवाय हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविण्यात यशस्वी ठरत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा मोठा आकडा गाठला आहे. दरम्यान आता अभिनेता स्वप्नील जोशीने केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.
बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री म्हणून जिनिलियाने भरपूर प्रेम आणि यश मिळवलं आहे. परंतु अभिनेत्रीने पहिल्यांदाच मराठी सिने सृष्टीत पाऊल ठेवलं आहे. विशेष म्हणजे जिनिलियाने तब्बल 10वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. 'वेड' हा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने नवी इनिंग सुरु करत दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा त्याच्यासाठी खास ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळत आहे.
(हे वाचा:Ved Box Office Collection: 'सैराट'ला मागे टाकणार 'वेड'? बॉक्स ऑफिस कमाईचा नवा आकडा थक्क करणारा )
दरम्यान अभिनेता स्वप्नील जोशीने एक ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याने ट्विट करत लिहलंय, '“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पढते पुढे! मनापासून अभिनंदन @Riteishd भाऊ, @geneliad वैनी आणि पूर्ण टीम!''. स्वप्नील जोशीने ट्विट करत चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही सुसाट कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करत जिनिलिया आणि रितेशसोबत संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धान्यवाद.. @swwapniljoshi - 🙏🏼🙏🏼
— Genelia Deshmukh (@geneliad) January 18, 2023
रितेश देशमुखने स्वप्नील जोशीच्या या सुंदर ट्विटला उत्तर देत लिहलंय, ''भाऊ …. मनापासून आभार - big hug @swwapniljoshi लवकर भेटू !!!... तर अभिनेत्री जिनिलिया देशमुखने उत्तर देत लिहलय, ''तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धान्यवाद..' जिनिलियाचा हा मराठी अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड पसंत पडत आहे.
भाऊ …. मनापासून आभार - big hug @swwapniljoshi लवकर भेटू !!! https://t.co/NPozVZXQYX
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 18, 2023
वेड बॉक्स ऑफिस कलेक्शन-
या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 20.18 कोटींची कमाई करत सर्वांनाच थक्क केलं होतं.
चित्रपटाने रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.4कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण तब्बल 48 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Riteish Deshmukh, Swapnil joshi