रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
वेड चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसऱ्या आठवड्यातसुद्धा वेडची जादू कायम आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रितेश आणि जिनिलियाने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याबाबतसुद्धा अनेक खुलासे केले होते.
एका मुलाखतीमध्ये जिनिलियाने आपल्या आवडत्या पदार्थांबाबत सांगितलं होतं. जिनिलियाने या मुलाखतीत आपल्याला महाराष्ट्रीयन पदार्थ बनवता येत असल्याचंही सांगितलं आहे.
या मुलाखतीमध्ये रितेशला पत्नी जिनिलियाच्या आवडत्या पदार्थांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, 'जिनिलियाला पाणीपुरी खूप आवडते. शिवाय ती महाराष्ट्रीयन पदार्थांची फॅन आहे'.
तिला आईच्या हातचं म्हणजेच सासूबाईंच्या हातचं पिठलं भाकरी, ठेचा,काळ्या मसाल्याची आमटी, शेंगदाण्याची चटणी आणि भगर अतिशय आवडत असल्याचं सांगितलं.