मुंबई, 06 जून : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती. ३ आठवडे उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती. Nithin Gopi Death: साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेत्याचं 39व्या वर्षी निधन, दोन महिन्यात 3 स्टारचा मृत्यू मार्च महिन्यात जेव्हा सुलोचना यांची प्रकृती गंभीर झाली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपचाराचा खर्च केला होता. मुख्यमंत्री निधीतून त्यांना उपचारासाठी ३ लाख रुपये देण्यात आले होते. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटातून काम केलं. यामध्ये त्या प्रमुख अभिनेत्रीसह सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसल्या होत्या. ४० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं. मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होया. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







