मुंबई, 4 जून- या वर्षात साऊथ फिल्म इंडस्ट्रीने अनेक कलाकार गमावले असून आता पुन्हा एक दुःखद बातमी समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दाक्षिणात्य अभिनेता नितीन गोपी ने या जगाचा निरोप घेतला आहे. नितीन गोपीचं अवघ्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला बेंगळूरू येथील त्याच्या घरी अचानक छातीत दुखू लागले आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे. नितीन गोपीने प्रामुख्याने कन्नड चित्रपट आणि छोट्या पडद्यावर काम केलं आहे. प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील ते एक प्रसिद्ध नाव होतं. हळूहळू चित्रपटांमध्येही त्याचं कार्य वाढत चाललं होतं. हॅलो डॅडी, केरळ केसरी, मुत्तिनंथा हेंदती, निशब्द आणि चिरबांधव्य या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. श्रुती नायडू निर्मित ‘पुनर्विवाह’ या लोकप्रिय मालिकेतही नितीनने महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि हा शो प्रचंड हिट झाला होता. Aamir Raza Hussain: मनोरंजनसृष्टीला आणखी एक धक्का; अभिनेता-दिग्दर्शक आमिर रजा हुसैन यांचं निधन नितीनने करिअरच्या सुरुवातीला टीव्हीवरही काम केलं आहे. त्याने ‘हर हर महादेव’ या मालिकेच्या काही भागांमध्ये कॅमिओ केला आहे. तसेच अनेक तमिळ मालिकांमध्ये काम केलं होतं. अभिनेता अलीकडेच एका वाहिनीशी एका नवीन वेब सीरिजच्या दिग्दर्शनासाठी बराच काळ चर्चा करत होता. नितीन गोपी यांच्या आकस्मिक निधनाने चंदन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार, लक्ष्मण, मनदीप रॉय आणि बुलेट प्रकाश यांच्यासह अनेक कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सरथ बाबू निधन- गेल्या महिन्यात तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारे सरथ बाबू यांचं 22 मे 2023 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने हैद्राबाद येथे निधन झालं होतं. सरथ बाबू यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते सुपरस्टार रजनीकांत यांचे जवळचे मित्र होते.
अल्लू रमेश निधन- सरथ बाबूच्या आधी, कॉमेडियन अल्लू रमेश यांचे एप्रिल 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांनी मुख्यत्वे तेलुगू इंडस्ट्रीत काम केलं होतं. आणि चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. अभिनेता 52 वर्षांचा होता. आणि 18 एप्रिल 2023 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं.