बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक अशी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची ओळख आहे. या दोघांनी एकत्र मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.
रितेश आणि जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' हा पहिला सिनेमा केला होता. यामधील दोघांची केमिस्ट्री प्रचंड पसंत करण्यात आली होती. हा सिनेमा तुफान गाजला होता.
सध्या रितेश आणि जिनिलिया आपल्या 'वेड' या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जिनिलियाने बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने पुनरागमनासाठी मराठी सिनेमाची निवड केली आहे.
सोबतच रितेश आणि जिनिलियाच्या पहिल्या सिनेमाला नुकतंच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्थातच या सेलिब्रेटी कपलने इंडस्ट्रीत 20 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे.
यानिमित्ताने नुकतंच जिनिलिया आणि रितेशने एका वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना एकमेकांबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
मुलाखती दरम्यान रितेशला त्याने जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं याबाबत विचारण्यात आलं. रितेशने दिलेलं उत्तर सध्या सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
रितेशने सांगितलं की, त्याने जिनिलियाला दिलेलं सर्वात पहिलं गिफ्ट हे एक गुलाबाचं फुल होतं. आणि महत्वाचं म्हणजे जिनिलियाने आजही ते फुल जपून ठेवलं आहे. तिने हे फुल एका पुस्तकात ठेवलं आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या या खुलाश्यानंतर दोघांचं प्रचंड कौतुक होत आहे. लोकांना या सेलिब्रेटी कपलची केमिस्ट्री पुन्हा एकदा भुरळ घालत आहे.