मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /इंटिमेट फोटो व्हायरल होण्याची भीती, लग्न मोडण्याची चिंता; आत्महत्येपूर्वी अशी होती वैशालीची अवस्था

इंटिमेट फोटो व्हायरल होण्याची भीती, लग्न मोडण्याची चिंता; आत्महत्येपूर्वी अशी होती वैशालीची अवस्था

वैशाली टक्कर

वैशाली टक्कर

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली टक्करच्या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. वैशालीच्या जवळच्यांसाठी हा खूप मोठा धक्काच होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑक्टोबर : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली टक्करच्या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. वैशालीच्या जवळच्यांसाठी हा खूप मोठा धक्काच होता. वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच अभिनेत्रीचा जवळचा मित्र आणि अभिनेता निशांत मलकानी याने वैशाली टक्करबद्दल न ऐकलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. निशांतने मीडिया हाऊसशी संवाद साधताना वैशाली टक्कर डिप्रेशनची शिकार असल्याचंही स्पष्ट केलं.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निशांतने सांगितले की, 'वैशाली बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती आणि ती मानसोपचार तज्ज्ञांकडून वैद्यकीय मदत घेत होती. राहुल वैशालीला पुढे जाऊ देत नव्हता. ती डिप्रेशनमध्ये होती. तिनं मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेतली. मला तिच्या त्रासाची खोली आता समजली, जेव्हा मला कळले तुम्ही कोणाशी तरी नातेसंबंधात असता तेव्हा जवळीक साधली जाते. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही ब्रेकअपनंतर ते इंटिमेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागलात. राहुलही तेच करत होता.'

हेही वाचा -  Diwali 2022: अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत प्रतिक्षावर केलं लक्ष्मीपूजन; ऐश्वर्या-आराध्याने वेधलं लक्ष

लग्नाआधी वैशाली मुंबईला येणार होती, असा खुलासाही निशांतने मुलाखतीदरम्यान केला होता. तो म्हणाला, आत्महत्येच्या चार दिवस आधी वैशालीशी माझं बोलणं झालं होतं. मी तिला तिच्या वजनावरुन चिडवायचो की ती किती बारिक झाली आहे, ती म्हणायची मी लवकरच बरी होईल.

वैशाली आणि राहुल यांनी डेट करायला सुरुवात केली तेव्हा राहुलने लग्न केले नव्हते. आई-वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल सहमती नव्हती, त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही.  मात्र दिशासोबत लग्न केल्यानंतर राहुलने वैशालीला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि तो तिला पुढे जाऊ देत नव्हता. वैशालीला तिची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीसोबत सेटल व्हायचं होतं आणि ती तिच्या लग्नाबद्दल खूप आनंदी होती, असंही निशांतने सांगितलं.

दरम्यान, वैशाली ठक्कर हिने 15 ऑक्टोबरच्या रात्री इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात वैशालीने तिच्या मृत्यूसाठी राहुलला जबाबदार धरले आहे. राहुल तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचंही वैशालीने चिठ्ठीत लिहिलं होतं.

वैशाली टक्करच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी राहुल नवलानीला अटक केल्यानंतर इंदूर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. राहुल नवलानी यांनी पोलिसांना सांगितले की, वैशालीने आत्महत्या करण्याच्या 6 तास आधी पत्नी दिशा हिला सुसाईड नोट पाठवली होती. राहुलला हा प्रकार कळताच त्याने याबाबत वैशालीच्या आईला सांगितले. राहुलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने वैशालीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. अशा स्थितीत वैशालीने आत्महत्या केल्याचे राहुलला समजताच तो आणि त्याची पत्नी वेगवेगळी पळून गेली.

First published:

Tags: Sucide attempt, Tv actress