मुंबई 15 जून: बिग बॉस मराठी फेम गायक उत्कर्ष शिंदे (
Utkarsh Shinde) हा सध्या बराच चर्चेत असतो. बिग बॉस नंतर त्याला बरीच प्रसिद्धी सुद्धा मिळाली आहे. उत्कर्ष एक गायक म्हणून खूप उत्तम कामगिरी करत आहे. आणि त्याच्या या कामगिरीला यश सुद्धा मिळत हजे हे त्याच्या रिसेन्ट इन्स्टाग्राम (
Utkarsh shinde Instagram) पोस्टवरून समजतं.
उत्कर्षच्या आयुष्यात एक मोठी सुखद घटना घडली आहे जी त्याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याला मिळालेल्या एका मोठा पुरस्काराची माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या 'मिरची म्युजिक अवार्ड्स' (
Mirchi Music Awards) मध्ये त्याच्या ‘नाद करा पण आमचा कुठं’ या गाण्यासोबत अख्ख्या' धुराळा' (
Dhurala) फिल्मच्या अल्बमला ‘म्युजिक अल्बम ऑफ द इअर’ चा पुरस्कार मिळाला आहे. यावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो असं म्हणतो, “Naad kara pan amcha kutha? Film DHURULA. हे मी संगीतबद्ध केलेल आणि लिहिलेल आणि मुझिक माइस्ट्रो माझे डॅड आनंद शिंदे व शिंदेशाहीचा वाघ आदर्श शिंदे ह्यांनी त्यांच्या आवाजाने त्याला ऑलरेडी हिट केल या आपल्या आवडत्या गाण्याची दखल घेत मुझिक लिसनर्स चॉईस अल्बम ऑफ दि यर धुरळा फिल्म "रेडिओ मिरची मुझिक अवार्ड्स "मिळाला आहे .
हे गाणं लिसनर्स ने फक्त ऐकून हिट केलं नाही तर ट्रक -ऑटो ट्रॅ-क्टर वर नाद करा पण आमचा कुठं ?लिहून ह्या गाण्यावरच प्रेम दाखवलं.
ह्या अवार्ड साठी प्रथम मी ह्या धुरळा फिल्मच्या निर्मितीत असलेल्या सर्वांचे व झी zee चे ज्यांनी हि फिल्म सर्वांन पर्यंत पोहोचवली त्यांचे आभार मानतो .कारण त्यांनी तो विश्वास दाखवला म्हणून हे गाणं मला अवघ्या 7-8 तासात कंप्लिट बनवून म्युझिक रिलीझ ला पाठवणं शक्य झालं.माझ्या सर्व टेक्निकल टीमचे ,वादकांचे,आभार मानतो .मित्रांनो हे अवार्ड हे यश तुम्हा सर्वांचं आहे . .adarsh आणि माझे वडील आनंद शिंदे ह्यांनी इतक्या शॉर्ट नोटिस वर हे गाणं माझ्या साठी गायलं त्यांचे आभार ,अवधूत वाडकर दादा ,मंदार वाडकर दादा ,अवि लोहार ने केलेली संयोजन ह्या सगळ्या माझ्या वर प्रेम करणाऱ्या सर्वांचं हे यश आहे . AV praful लव्ह यू भावा ह्या फिल्मची अन्य गाणी केलीस ज्यांची मज्जाच और आहे.”
हे ही वाचा- जेनेलियांनी सासरे विलासराव देशमुख यांची शेअर केली खास आठवण, कॅप्शननं वेधलं लक्ष
उत्कर्षने ‘नाद करा पण आमचा कुठं’ च्या रूपात एक खूप झणझणीत गाणं तयार केलं होतं. त्याने संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं हे गाणं म्युजिक माइस्ट्रो अर्थात त्याचे वडील आनंद शिंदे व शिंदेशाहीचा वाघ असलेला आदर्श शिंदे ह्यांनी त्यांच्या आवाजाने त्याला ऑलरेडी सुपरहिट केलं. त्यावर हजारोंच्या घरात लोकांनी रील्स केले. उत्कर्षने यात
रील्स केलेल्या अनेकांचे आभार मानले तसंच ‘धुराळा’ टीमचे सुद्धा आभार मानले. ते अनेक ठिकाणी वाजलं जाणारं गाणं होत. अशा गाण्याची एवढ्या माननीय पुरस्कार सोहळ्यात दखल घेतली जाणं त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं त्याने पोस्ट मध्ये म्हणलं आहे. सोबतच त्याने ए व्ही प्रफुलचंद्र ज्यांनी धुराळा चित्रपटातील इतर गाणी केली त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. उत्कर्षच्या या गाण्याने खऱ्या अर्थाने या अल्बमची शान वाढवली. या गणायचे अनोखे बोल, त्याची चाल सगळंच लक्षवेधी होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.