कोलकत्ता, 19 जून- माजी मिस इंडिया उशोशी सेनगुप्तासोबत सोमवारी अशी हृदयद्रावक घटना घडली की, तुम्हालाही चिड आल्यावाचून राहणार नाही. स्वतः उशोशीने फेसबुकवर ही घटना शेअर करत त्या रात्री नेमकी काय झालं ते सविस्तर सांगितलं. उशोशी सेनगुप्ता तिचं काम संपवून कोलकत्यातील एका हॉटेलमधून बाहेर पडत आपल्या घरी परतत होती. ही घटना सोमवारी रात्रीची आहे. घरी जाण्यासाठी तिने उबर कॅबला बोलावले.
मीडिया रिपोर्टनुसार आणि उशोशीने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टनुसार सोमवारी रात्री ११.४० च्या सुमारास उशोशी जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमधून काम संपवून घरी जायला निघाली. तिच्यासोबत तिचा सहकारीही होता. दोघांनी उबर कॅब बुक केली. अर्ध्या रस्त्यावर पोहोचले असतील तेव्हा मुलांची एक टोळी बाइकवरून त्यांच्या गाडीच्या जवळ आली. त्यांनी बाइकने उबर गाडीला टक्कर दिली. त्यानंतर गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर काढून बेदम मारलं.
का VIRAL होत आहे सलमान खानचा हा वर्कआउट व्हिडिओ? पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
उशोशीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, ‘जिकडे ही घटना घडली तिथे तिला एक पोलीस अधिकारीही दिसला. तिने पोलिसाला त्या मुलांना थांबवण्याची विनंती केली. पण त्या पोलीस अधिकाऱ्याने तो परिसर भवानीपुर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असल्याचं त्याने म्हटलं. मात्र उशोशीने सतत विनंती केल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने काही मुलांना पकडलं. पण मुलांनी पोलिसाला धक्का देत तिथून पळ काढला. यानंतर थोड्यावेळाने भवानीपुर पोलीस ठाण्यातून दोन अधिकारी आले. तोवर १२ वाजले होते. त्यानंतर उशोशीने ड्रायव्हरला तिला आणि तिच्या सहकलाकाराला घरी सोडण्यास सांगितलं आणि सकाळी पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.’
...म्हणून तब्बल 16 वर्ष हा सुपरस्टार शाहरुख खानशी एक शब्दही बोलला नाही
आपल्या लांबलचक पोस्टमध्ये उशोशी सेनगुप्ताने कोलकता पोलिसांसह अनेक वृत्तवाहिन्यांना आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केलं आहे. उशोशीच्या पोस्टनंतर कोलकता पोलिसांनीही ममता बॅनर्जी यांना टॅग करत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कोलकता पोलिसांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं की, ‘आम्ही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहोत. या प्रकरणात आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे.’ उशोशी सेनगुप्ताने २०१० मध्ये स इंडिया यूनिव्हर्सचा किताब जिंकला होता.
…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली
VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?