का VIRAL होत आहे सलमान खानचा हा वर्कआउट व्हिडिओ? पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सुपरस्टार सलमान खान त्याच्या फिटनेसबद्दल आणि सिनेमांसाठीच्या त्याच्या प्रेमासाठी ओळखला जातो. सलमान त्याच्या वर्कआउट आणि फिटनेसवर फार लक्ष देतो.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 04:18 PM IST

का VIRAL होत आहे सलमान खानचा हा वर्कआउट व्हिडिओ? पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई, 18 जून- सुपरस्टार सलमान खान त्याच्या फिटनेसबद्दल आणि सिनेमांसाठीच्या त्याच्या प्रेमासाठी ओळखला जातो. सलमान त्याच्या वर्कआउट आणि फिटनेसवर फार लक्ष देतो. चित्रीकरणात तो कितीही व्यग्र असला तरी तो दिवसभरातला व्यायाम कधीच चुकवत नाही. त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर होत असतात. एवढंच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना त्याने फिटनेसचं ट्रेनिंग दिलं आहे. आज दिवसभर त्याचा जिममध्ये घाम गाळतानाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

…म्हणून शूटिंग अर्धवट सोडून Alia Bhatt मुंबईत परतली

सलमानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सलमान स्वतःच्या जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. पण या व्हिडिओमध्ये एक मजेशीर ट्विस्ट आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, दोन माणसं जिम इक्विपमेंटच्या वरती बसले आहेत आणि ते इक्विपमेंट सलमान आपल्या पायांनी उचलत आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहायला फार मजेशीर आहे.Loading...


 

View this post on Instagram
 

After experiencing the highs and lows my security has finally realised how secure they are wid me .. ha ha


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

International Yoga Day योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सी

सलमाननेही या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन देत म्हटलं की, त्याचे सुरक्षारक्षकांनाही हे माहीत आहे ती ते सलमानसोबत किती सुरक्षित आहेत. सुरक्षारक्षकांसोबतंच सलमानचे हे वर्कआउट भन्नाट आहे. सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा भारत सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफची मुख्य भूमिका होती. सध्या तो दबंग ३ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...