'सविता दामोदर परांजपे'ची परदेशवारी!

'सविता दामोदर परांजपे'ची परदेशवारी!

अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाने मिळवला आहे.

  • Share this:

मुंंबई, 7 सप्टेंबर : मराठी चित्रपटांची परदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही, पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटाने मिळवला आहे.

गेल्या शुक्रवारी (३१ ऑगस्ट) प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज शुक्रवार (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहांतून झळकणार आहे. ऑस्टिन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात 'सविता दामोदर परांजपे' प्रदर्शित होणार आहे.

प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १ कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून दररोज ४१० शोज दाखवले जात आहेत. बऱ्याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षक व्यक्त करताहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले हे महत्त्वाचे.

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे,  तृप्ती तोरडमल,  राकेश बापट,  अंगद म्हसकर,  पल्लवी पाटील,  सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. तृप्ती तोडरमलचा हा पहिलाच चित्रपट. पण तिच्या कामाचं कौतुक होतंय.

चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन आणि संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर- वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभूअरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत.

VIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत?

First published: September 7, 2018, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading