मुंबई, 6 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत आपल्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री बऱ्याच वेळा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना संभ्रमात टाकत असते. उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांचं शीतयुद्ध सर्वांनाच माहितेय. हे दोघेही सतत सोशल मीडियावर क्रिप्टीक पोस्ट करत एकेमकांना खडे बोल सुनावत असतात. मात्र सध्या ऋषभ पंत गंभीर अपघात झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. जगभरातून ऋषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरा होण्यासाठी पोस्ट आणि मेसेजेस करत आहेत. अशातच उर्वशी मात्र आपल्या पोस्ट आणि फोटोंमुळे ट्रोल होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा गंभीर कार अपघात झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्याठिकाणी आवश्यक ते उपचार करुन पुढील उपचारासाठी ऋषभला मुंबईमध्ये हलवण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या गुडघ्याला सतत सूज येत असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेत विलंब होत असल्याची माहितीसमोर आली होती. दरम्यान ऋषभला मुंबईमधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. **(हे वाचा:** Urvashi Rautela: एकीकडे काळजी दुसरीकडे बर्थ डे सेलिब्रेशन; उर्वशीच्या Videoमुळे नेटकरी पेटले ) अशातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. अभिनेत्रीने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचा आहे. याच ठिकाणी ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. उर्वशीने ही पोस्ट शेअर करताच प्रचंड व्हायरल होत आहे.
This is mental harrasment. If a man did this, he'd either be in jail or have a Netflix crime documentary in his name. pic.twitter.com/q2f4BmK7Xk
— Sagar (@sagarcasm) January 5, 2023
काहींनी उर्वशी ऋषभला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेल्याचा अंदाज बांधत तिचं कौतुक करत आहेत. तर काहींनी उर्वशीला चांगलाच धारेवर धरलंय. उर्वशी करत असलेला सर्व प्रकार एक प्रकारही हॅराशमेंट असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हेच जर त्या मुलाने केलं असतं तर तो आज जेलमध्ये असता किंवा त्याच्यावर नेटफ्लिक्सवर सीरिज बनवण्यात आली असती असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ऋषभच्या अशा परिस्थितीतसुद्धा उर्वशी अशा पोस्ट करुन लक्ष वेधून घेत असल्याने अनेकांनी तिला सोशल मीडियावर कमेंट करत झापलं आहे.
यापूर्वीही उर्वशीने ‘प्रेयिंग’ अशी पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामध्ये तिने आपला एक फोटो शेअर केला होता, त्यावरूनसुद्धा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान उर्वशीच्या आईनेसुद्धा ऋषभसाठी प्रार्थना करत एक पोस्ट शेअर केली होती त्यांनतर त्यांनाही ट्रोल करण्यात आलं होतं. या मायलेकी सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.