मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urmila Matondkar : खासदारकी ही नाही आमदारकीही नाही; उर्मिला मातोंडकरने शेवटी शोधला हा मार्ग

Urmila Matondkar : खासदारकी ही नाही आमदारकीही नाही; उर्मिला मातोंडकरने शेवटी शोधला हा मार्ग

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर

मधल्या काळात ती राजकारणात सक्रिय असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 3 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. मधल्या काळात ती राजकारणात सक्रिय झाली होती. पण आता ती पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अनेक वर्षांनी पुन्हा तिच्या अभिनयाचा जलवा  प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यावेळी चित्रपट नाही तर ओटीटी माध्यमांतून ती झळकणार आहे. नव्वदीच्या दशकातील माधुरी दीक्षित, रवीना टंडन, सुष्मिता सेन या अभिनेत्रींप्रमाणेच आता  उर्मिला मातोडकर देखील ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करणार आहे.

उर्मिलाच्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला आहे. सौरभ वर्माच्या आगामी 'तिवारी' या थ्रिलर वेब सीरिजमधून ती ओटीटीच्या जगात पदार्पण करणार आहे.  या वेब सिरींजमधील तिचा लुक खूपच दमदार आहे.  'तिवारी'च्या फर्स्ट लूकमध्ये उर्मिला जखमी दिसत असली तरी तीअ‍ॅक्शनमध्ये आहे आणि काहीतरी करायला तयार आहे, असे तिच्या नजरेतून दिसते. या पोस्टरमध्ये “या वेळी शेवटी उरणारी व्यक्ती एक महिला आहे” असे लिहिलेले आहे. एकूणच पोस्टरवरुन ही वेब सीरिज अ‍ॅक्शनपटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी उर्मिलाने घेतलेली शारीरिक मेहनतही दिसून येत आहे.

हेही वाचा - Adipurush Teaser :'हा चित्रपट म्हणजे रामायणाचा अपमान'; 'आदिपुरुष'चा टीझर पाहून असं का म्हणतायत प्रेक्षक?

उर्मिला मातोंडकरने तिच्या इंस्टाग्रामवरून  'तिवारी' चे पोस्टर  शेअर केले आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये उर्मिला अतिशय खतरनाक स्टाईलमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर रक्त आणि विखुरलेल्या केसांनी ती खूपच आक्रमक दिसत आहे. उजव्या हातातील फाटलेला रुमाल तिच्या तोंडासमोर आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिला मातोंडकरची ही आगामी वेब सिरीज आई-मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात एका छोट्याशा शहराची कथा दाखवण्यात येणार आहे, जी भावूक आणि थरारकही असेल. यामध्ये फक्त उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आणि जोरदार आहे.

उर्मिला मातोंडकर तिच्या वेब डेब्यूबद्दल खूप उत्सुक आहे. ‘तिवारी’ वेब सीरिजबद्दलची माहिती देताना उर्मिला म्हणाली की, “मी याआधी या प्रकारची भूमिका साकारली नव्हती. या कथेमुळे आणि भूमिकेमुळे एक कलाकार म्हणून काहीतरी नवीन करायची संधी मला मिळाली. या सीरिजच्या तरुण लेखकांनी स्क्रिप्ट वाचताना मला शेवटपर्यंत खेळवून ठेवले. आई आणि तिच्या लेकीमधील नातं यावर आधारलेल्या या सीरिजमध्ये अनेक अ‍ॅक्शन सीन्सदेखील आहेत. कथा जसजशी पुढे जाते तसतसे त्यात येणारे ट्विस्ट वाढत जातात. या शोचे शूटिंग सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

सौरभ वर्मा हे या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. तर कॉन्टेंट इंजीनिअर्स या निर्मिती संस्थेद्वारे या सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. या सीरिजमध्ये उर्मिला मातोंडकरने साकारलेल्या भूमिकेचे नाव मुद्दामून ‘तिवारी’ असे ठेवण्यात आले आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment