मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आता तर छोट्याशा सिमकार्डनेच झाकलं शरीर; उर्फी जावेदच्या नव्या लूकने चाहत्यांना दिला धक्का

आता तर छोट्याशा सिमकार्डनेच झाकलं शरीर; उर्फी जावेदच्या नव्या लूकने चाहत्यांना दिला धक्का

urfi javed

urfi javed

आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा नवा लुक केला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच तिचा नवा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 23 सप्टेंबर : आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा नवा लुक केला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच तिचा नवा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. उर्फी कशापासून काय बनवेल याचा नेम नाही. ती कशापासूनही ड्रेस तयार करु शकते. उर्फीने परिधान केलेला नवा ड्रेस चक्क सिमकार्डपासून बनवला आहे. उर्फीने प्रत्येक वेळी तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. उर्फीचा नवा ड्रेस सिमकार्डपासून बनवला आहे. हा ड्रेस निळ्या आणि पिवळ्या रंगांमध्ये बनवला आहे. तिच्या या ड्रेससाठी 2 हजार सिमकार्डचा वापर करण्यात आला आहे. सिमकार्डपासूनही ड्रेस बनवू शकतो असा विचार चुकूनही कोणाच्या मनात आला नसेल. मात्र अतरंगी उर्फीने हाही प्रयोग करुन पाहिला. हेही वाचा -  Nupur Shikhare: मिस्टर परफेक्शनिस्टचा जावई तर रणवीर सिंहचाही 'बाप'; विना कपडे केलं असं PHOTOSHOOT उर्फी नेहमीच तिच्या नव्या लुकमध्ये क्रियेटिव्हीटी करताना दिसते. अतरंगी कपड्यांमुळे उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते खरी मात्र यासाठी करत असलेली तिची मेहनत कौतुकास्पद आहे. यावेळी उर्फीच्या मेहनतीला अनेकांनी दाद दिली आहे. तिच्या या लुकवर अनेक प्रतिक्रिया उमटत असलेली पहायला मिळत आहे.
View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. दररोज नवनवीन आणि अतरंगी कपड्यांमध्ये उर्फी पहायला मिळते. प्रत्येक वेळी नव्या लुकमध्ये येऊन ती नेटकऱ्यांना हैराण करत असते. आजकाल उर्फी तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत असते.
First published:

Tags: Fashion, Instagram post, New look, Social media, Tv actress

पुढील बातम्या