मुंबई, 8 ऑक्टोबर : आपल्या नवीन लूकने इंटरनेटला चकित करणारी अभिनेत्री उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यात ती कोणतीही कसर सोडत नाही. कधी तिच्या बोलण्याने तर कधी तिच्या लूकने ती लोकांना कायमच थक्क करत आली आहे. मात्र यावेळी उर्फी स्वतःच थक्क झाल्याचं पहायला मिळालं. उर्फीसारखी फॅशन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीाडियालवर ट्रेंड करत आहे. उर्फी जावेदची कॉपी करण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उर्फी सारखे कपडे आणि उर्फी जशी विधान करते अगदी तसंच त्यानं करण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओनं सध्या इंटरनेटचं वातावरण गरम केलंय. चक्क उर्फीनंही या व्हिडीओवरर कमेंट केली आहे. उर्फीनं म्हटलं की, ‘माय फॅशन नो क्वेशन’.
या व्हिडीओवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ‘याच्यापुढे उर्फी पण फेल, दिल जीत लिया, कडक, उर्फीचा खूप मोठा फॅन आहे वाटतं, ये क्या बला है, मस्ता केलंय’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. अनेकजण व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट होत आहेत.
दरम्यान, उर्फी तिच्या फॅशमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ओटीटी केल्यापासून ती तर मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात आली. बोल्ड लुक, अतरंगी फॅशन यामुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरते. कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते.