मुंबई, 11 सप्टेंबर : उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. तिचं नाव येताच पहिली तिची अतरंगी फॅशन डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. दररोज नवनवीन आणि अतरंगी कपड्यांमध्ये उर्फी पहायला मिळते. प्रत्येक वेळी नव्या लुकमध्ये येऊन ती नेटकऱ्यांना हैराण करत असते. पुन्हा एकदा उर्फी नव्या आणि हटके स्टाईलमध्ये स्पॉट झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही तिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. उर्फी जावेदचा समोर आलेला नवा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी उर्फी लाल रंगाच्या मिनी स्कर्ट आणि हार्ट कट टॉपमध्ये अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसली. उर्फीचा नव्या लुकमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. हेही वाचा - Urfi javed : मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली ‘माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर…’ उर्फी या नव्या लुकमध्ये बाहेर आली तेव्हा ती तिच्या चाहत्यांसोबतही भेटली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी कोणाला तरी बोलताना दिसतेय की, ‘एवढ्या गर्मीमध्ये तू हुडी का घालून आलीस?. तुला पाहून मलाच घाम फुटला’. पुढे उर्फी म्हणते की, ‘मी कमी कपडे घालते म्हणून तू जास्त कपडे घातलेत का. मी कमी घालतेय तर तू जास्त घालणार असं काही आहे का. मुंबईत एवढी थंडी नसते’. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगच्या निशाण्यावर आला आहे.
दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.