मुंबई, 21 ऑक्टोबर : बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. दररोज ती मुंबईच्या रस्त्यांवर नव्या अवतारात पहायला मिळते. अनेकवेळा उर्फी तिच्या असामान्य फॅशनमुळे ट्रोलिंगची शिकारही झाली आहे. पण तरीही ती लूक आणि कपड्यांवर प्रयोग करणे थांबवत नाही. उर्फी कधी कशापासून कोणता लुक बनवेल याचा काही नेम नाही. आता उर्फी जावेदचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा विचित्र ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिचा नवा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फी जावेदचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये उर्फीने फुफ्फुसाच्या डिझाइनचा बॅकलेस टॉप परिधान केला आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की ‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
उर्फीच्या या लुकवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिनं हॉलिवूड अभिनेत्रीच्या लुकची कॉपी केल्याचं म्हटलं आहे. उर्फीचा हा लूक बेला हदीदच्या लूकची कॉपी आहे, असं युजर्ज म्हणत आहेत. जो तिने कान्स 2021 मध्ये कॅरी केला होता. त्यामुळे ती ट्रोलर्सच्याही निशाण्यावर आली आहे.
दरम्यान, कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते. हटके अंदाज फॅशन दाखवत ती आत्मविश्वासानं मीडियासमोर येते. तिच्या चाहते मात्र तिच्या फॅशन आणि मेहनतीची दाद देताना दिसतात.