मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांची प्रकृती बिघडली, ICUमध्ये उपचार सुरू

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांची प्रकृती बिघडली, ICUमध्ये उपचार सुरू

मुनव्वर राणांची प्रकृती बिघडली

मुनव्वर राणांची प्रकृती बिघडली

Munawwar Rana Health Update : मुनव्वर राणा यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून याची माहिती मुलगी सुमैया राणा यांनी दिली.

लखनऊ, 25 मे : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लखनऊच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून याची माहिती मुलगी सुमैया राणा यांनी दिली. सुमैय्या यांनी व्हिडीओद्वारे सांगितलं की, वडिलांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडत चालली होती. पण आता जास्तच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. वडिलांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करा असंही सुमैय्या यांनी म्हटलंय.

गेल्या तीन दिवसांपासून मुनव्वर राणा यांची प्रकृती जास्त बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी पुढचे 72 तास महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. मुनव्वर राणा यांच्या प्रकृतीवर ते लक्ष ठेवून आहेत. लवकरच ते बरे होतील अशी आशा कुटुंबीयांना आहे.

अवतार ते किसी का भाई...; थिएटरनंतर OTT वर रिलीज होतायेत 5 धमाकेदार सिनेमे

मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी आहेत. उर्दू साहित्यासाठी 2014 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2012 मध्ये शहीद शोध संस्थानकडून माटी रतन सन्मानने त्यांना गौरवण्यात आलं होतं. मुनव्वर राणा यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे कोणताही सरकारी पुरस्कार न घेण्याची शपथ घेतली आहे.

First published:
top videos