मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'और कितना गिरोगी'; पडता पडता वाचली Uorfi javed, पाहा VIDEO

'और कितना गिरोगी'; पडता पडता वाचली Uorfi javed, पाहा VIDEO

uorfi javed

uorfi javed

उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर आपल्या अतरंगी लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे ट्रोलदेखील होत असते.

  मुंबई, 19 ऑगस्ट : उर्फी जावेद (Uorfi javed) नेहमीच निरनिराळे कपडे घालून आपल्या चाहत्यांना थक्क करते. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फी तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय. उर्फीनं केलेला यावेळीचा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला पहायला मिळाला. या वन पीसमध्ये अभिनेत्रीने पापाराझींना एकापेक्षा एक पोजही दिल्या. मात्र यावेळी पोझ देताना उर्फी पडता पडता वाचली. तिचा पडतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शिवाय उर्फीचा नवा लुक जोरदार व्हायरल होतोय. यावेळीही ट्रोलर्सनं तिला ट्रोल करायचं काही सोडलं नाही. 'और कितना गिरोगी, याच्या पेक्षा जास्त काय पडणार तू', अशा अनेक प्रकारच्या कमेंट ट्रोलर्सनं केलेल्या पहायला मिळाल्या.
  उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर आपल्या अतरंगी लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे ट्रोलदेखील होत असते. परंतु या सर्वांचा उर्फीवर अजिबात परिणाम होत नाही. ती नेहमीच आपल्या अंदाजात वावरत असते. ट्रोलिंगचा स्वतःवर अजिबात परिणाम होऊ देत नाही. आतापर्यंत उर्फीनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत हटके कपडे बनवले आहेत. प्रत्येक वेळी ती आपल्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत असते. तिच्या लूकचं अनेकजण कौतुकही करतात तर काहीजण तिला ट्रोलही करतात. हेही वाचा -  Zwigato: कपिल शर्माचा आगामी सिनेमा थेट पोहोचला आंतरराष्ट्रीय महोत्सवात; VIDEO करतोय इम्प्रेस दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Big boss, Bigg Boss OTT, Fashion, Instagram post, Tv actress

  पुढील बातम्या