मुंबई, 19 ऑगस्ट- आपल्या विनोदीवृत्ती आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर कॉमेडियन कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.अभिनेत्याने अभिनयातसुद्धा हात अजमावला होता, परंतु त्या चित्रपटाला हवा तास प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कपिल छोट्या पडद्यावर पुन्हा परतला होता. काही वर्षाच्या विश्रांतीनंतर कपिल पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच नंदिता दास यांच्या ‘ज्विगॅटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच कपिलला मोठं सरप्राईज मिळालं आहे.
कपिल शर्माचा नवा चित्रपट 'ज्विगॅटो'चं पहिलं पोस्टर काल रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये कपिल फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं पोस्टर्स फारच मजेशीर दिसत आहेत. दरम्यान कपिलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे या अभिनेत्याच्या चित्रपटाला 47 व्या टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत एन्ट्री मिळाली आहे.
आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत कपिलनं लिहलंय, " एप्लॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्ह्सला जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की नंदिता दास दिग्दर्शित आणि कपिल शर्मा, शहाना गोस्वामी स्टारर चित्रपट 'ज्विगॅटो' या चित्रपटाची 47 व्या टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या बातमीनंतर कपिल आणि त्याच्या टीमवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
In the World Premiere of ZWIGATO, director @nanditadas trains her sociopolitical gaze on the gig economy with this story about the trials and tribulations of a food app delivery driver. Starring @KapilSharmaK9 and @shahanagoswami. #TIFF22 https://t.co/cl8a1WASTL pic.twitter.com/gOVxM0Ewym
— TIFF (@TIFF_NET) August 17, 2022
(हे वाचा:Laal Singh Chaddha: बॉयकॉटनंतर काय आहे चित्रपटाची अवस्था; समोर आलं आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन )
तर दुसरीकडे TIFF ने या चित्रपटाची एक क्लिप देखील शेअर केली असून लवकरच हा चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये कपिल आणि शहाना पती-पत्नी असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटात कपिलची पत्नी बनलेली शहाना पतीला सोडून कामावर जाण्याची चर्चा करत आहे. तर कपिल पत्नीची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही काम करायला तयार नाहीय. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kapil sharma