जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बस प्यार ही प्यार...'; प्रियाच्या बर्थडेला उमेश झाला रोमँटिक, 'तो' व्हिडीओ शेअर म्हणाला...

'बस प्यार ही प्यार...'; प्रियाच्या बर्थडेला उमेश झाला रोमँटिक, 'तो' व्हिडीओ शेअर म्हणाला...

'बस प्यार ही प्यार...'; प्रियाच्या बर्थडेला उमेश झाला रोमँटिक, 'तो' व्हिडीओ शेअर म्हणाला...

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. आपल्या हास्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रियाचा आज वाढदिवस आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. आपल्या हास्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रियाचा आज वाढदिवस आहे. आज प्रियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळतोय. अशातच तिचा नवरा उमेश कामतनेही तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक स्पेशल व्हिडीओ शेअर करत उमेशने प्रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्रियाच्या आणि त्याच्या सुंदर आठवणींचे कोलाज केलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रोमॅन्टिक अंदाजाच उमेशने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. यासोबत ‘हॅपी बर्थ डे बायको’, असं कॅप्शनही उमेशने या व्हिडीओला दिलंय.

जाहिरात

मराठीतील लोकप्रिय जोड्यांपैकी उमेश-प्रियाला ओळखलं जातं. त्यांचे अनेक चाहते आहेत. उमेश कामत आणि प्रियाच्या कपल गोल्सनाही नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत असतात. तब्बल 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची लवस्टोरीही फारच फिल्मी आहे. हेही वाचा -  Priya Bapat B’day: प्रियाच्या घरातून होता लग्नास नकार; फारच फिल्मी आहे या जोडीची Love Story दरम्यान, प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात