मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Twinkle Khanna : बॉयफ्रेंडसोबत क्लासरूममध्ये अडकली होती ट्विंकल, सांगितला मजेशीर किस्सा

Twinkle Khanna : बॉयफ्रेंडसोबत क्लासरूममध्ये अडकली होती ट्विंकल, सांगितला मजेशीर किस्सा

शाळेत असताना ट्विंकलचं (Twinkle Khanna) एका मुलावर प्रेम होतं. एकदा ते दोघंही क्लासरूमध्ये बसून गप्पा मारण्यात इतके मग्न झाले की शाळा सुटल्याचंही त्यांना समजलं नाही आणि दोघं क्लासमध्ये तसेच बसून राहिले.

मुंबई 15 फेब्रुवारी : चित्रपटांमध्ये आपण अभिनेता आणि अभिनेत्रीच्या अनेक प्रेमकथा पाहतो. मात्र, या कलाकारांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसते. असाच आपला एक किस्सा अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानं (Twinkle Khanna) सांगितला आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा ट्विंकल शाळेत होती आणि तिला एक बॉयफ्रेंडही होता. ट्विंकल आपल्या बेधडक अंदाजामुळं ओळखली जाते आणि आता तिनं शेअर केलेला किस्सा वाचून तुम्हाला हेदेखील समजेल की आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टीदेखील ती चाहत्यांसोबत शेअर करते.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाला लिखाणाचा छंद आहे. तिनं आपल्या एका आर्टीकलमध्ये या मजेशीर घटनेचा उल्लेख केला आहे. शाळेत असताना ट्विंकलचं एका मुलावर प्रेम होतं. एकदा ते दोघंही क्लासरूमध्ये बसून गप्पा मारण्यात इतके मग्न झाले की शाळा सुटल्याचंही त्यांना समजलं नाही आणि दोघं क्लासमध्ये तसेच बसून राहिले. यानंतर दोघंही क्लासरूमच्या खिडकीमधून उडी घेऊन बाहेर पडले. ट्विंकल म्हणाली, की आज तो मुलगा माझ्यासमोर आला तर कदाचित मी त्याला ओळखणारही नाही.

ट्विंकलनं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1995 मध्ये बरसात या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या फिल्ममध्ये ती अभिनेता बॉबी देओलसोबत झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. मात्र, पुढे तिचं अॅक्टिंग करिअर म्हणावं असं यशस्वी नव्हतं. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती अनेकदा मुलांसोबतचे आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला आता 20 वर्ष झाली आहेत. या दोघांनी 2001 मध्ये लग्नगाठ बांधली होती. यातही रंजक गोष्ट अशी, की ट्विंकलला तेव्हा अक्षयसोबत लग्न करायचं नव्हतं. मात्र, अक्षयनं तिला म्हटलं होतं, की जर तिचा मेला सिनेमा फ्लॉप झाला तर ट्विंकलला अक्षयसोबत लग्न करावं लागेल. यानंतर हा सिनेमा फ्लॉप झाला आणि ट्विंकल अन् अक्षयनं लग्नगाठ बांधली.

First published:

Tags: Akshay Kumar, Love story, Twinkle khanna