Twinkle Khanna ने चक्क 'या'सोबत केली अक्षयच्या पांढऱ्या दाढीची तुलना, शेअर केला फोटो
Twinkle Khanna ने चक्क 'या'सोबत केली अक्षयच्या पांढऱ्या दाढीची तुलना, शेअर केला फोटो
Akshay Kumar
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बॉलिवूडच्या फेमस कपल्सपैकी एक आहे. दरम्यान नुकतंच ट्विंकलने अक्षयचा एक फोटो शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन दिली आहे. तिने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली, 28 जानेवारी: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बॉलिवूडच्या फेमस कपल्सपैकी एक आहे. दोघे सोबत असतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री प्रत्येकाला आवडते. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. दरम्यान नुकतंच ट्विंकलने अक्षयचा एक फोटो शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन दिली आहे. तिने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला याच महिन्यात 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकजण दोघांना आदर्श कपल मानतात. हे कपल नेहमी सोशल मीडियावर एकमेकांसदर्भातील मजेशीर गोष्टी शेअर करत असतात. नुकतंच ट्विंकलने अक्षयचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय म्हातारा दिसत आहे. आणि असेच काहिसे वर्णन सांगत ट्विंकलने अक्षयच्या दाढीची तुलना विस्कीशी केली आहे.
ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षयने निळसर आकाशी कलरचा शर्ट परिधान केला आहे. या फोटमध्ये त्याने दाढी वाढवली असून पांढरी ठेवली आहे. याच दाढीवरुन मजेशीर कॅप्शन देत ट्विंकल म्हणाली, 'आपला माल...य एखाद्या जुन्या विस्की प्रमाणे वाढते आहे. तुम्हाला पण असे वाटते का?' असा मजेशीर सवाल तिने उपस्थित केला आहे.
तिची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट 18 मार्च 2022ला प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर 2’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.