मुंबई 7 मे: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्यव्यवस्थेवरही ताण वाढला आहे. परिणामी रुग्णालयात बेड, औषधं, लसी यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केलाय. (coronavirus pandemic) मात्र यामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar). कोट्यवधींचा मालक असूनही वर्गणी गोळा करुन मदत का करतोय? असा प्रश्न त्याला वारंवार विचारला जात आहे. मात्र अशा प्रश्नांमुळं अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) संतापली आहे. अन् तिनं ट्विटरद्वारे या ट्रीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाली ट्विंकल?
एका माजी अधिकाऱ्यानं “ट्विंकलजी, तुमचे पतिदेव या देशातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. वर्गणी गोळा करून लोकांची मदत करण्याचं नाटक करण्यापेक्षा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आणखी थोडं मन मोठं करून इतरांची मदत केली असती तर ते चांगलं असतं. ही मदत मागण्याची नाही मदत करण्याची वेळ आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन अक्षयवर टीका केली होती.
Photo:“परत भोपळे चौक अवस्था”; प्राजक्ता माळीवर आली भांडी घासण्याची वेळ
Have donated 100 concentrators toward this cause&in multiple other https://t.co/wxYyujPCtT I’ve said before,it’s not about me or you but what we can do collectively for those in need.Sad that at this point,instead of pitching in,we expend energy in pulling people down.Stay safe. https://t.co/N3qvcjayhe
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) May 6, 2021
यावर ट्विंकलनं “आता पर्यंत 100 कॉन्सण्ट्रेटर्स दान केले आहेत. त्याशिवाय आणखीही मदत करत आहोत. जसं मी आधी पण स्पष्ट केलं आहे की हे माझ्या किंवा तुमच्याबद्दल नाहीये. आपल्याला सगळ्यांना मिळून गरजू लोकांची मदत करायची आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे की आता जेव्हा मिळून इतरांची मदत केली पाहिजे तेव्हा काही लोक दुसऱ्यांना त्रास देण्यात आणि ट्रोल करण्यात गुंतले आहेत. तुम्ही सुरक्षित राहा.” अशा आशयाचं प्रत्युत्तर दिलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Coronavirus, Twinkle khanna