मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘माझ्या मुलीचं काहीही भविष्य नाही’; नितारानं ट्विंकल खन्नाला दिली अनोखी शिक्षा

‘माझ्या मुलीचं काहीही भविष्य नाही’; नितारानं ट्विंकल खन्नाला दिली अनोखी शिक्षा

निताराला मोठं होऊन करायचंय या क्षेत्रात करिअर; पण ट्विंकल म्हणतेय माझ्या मुलीचं काहीही भविष्य नाही... कारण...

निताराला मोठं होऊन करायचंय या क्षेत्रात करिअर; पण ट्विंकल म्हणतेय माझ्या मुलीचं काहीही भविष्य नाही... कारण...

निताराला मोठं होऊन करायचंय या क्षेत्रात करिअर; पण ट्विंकल म्हणतेय माझ्या मुलीचं काहीही भविष्य नाही... कारण...

मुंबई 28 मे: अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं अनेकदा चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल करण्यात देखील येतं. मात्र यावेळी ट्विंकल कुठल्याही वादग्रस्त विधानामुळं नव्हे तर तिच्या मुलीनं तिला दिलेल्या शिक्षेमुळं चर्चेत आहे. या मुलीचं काहीही भविष्य नाही असं म्हणत तिनं आपला लटका राग व्यक्त केला आहे. (hilarious punishment from daughter)

ट्विंकल सध्या आपल्या मुलांसोबत घरात वेळ घालवत आहे. तिची मुलगी नितारा हिला मेकअप करण्याची भरपुर हौस आहे. संधी मिळताच ती आपल्या आईसोबत मेकअप आर्टिस्ट हा खेळ खेळते. यावेळी देखील तिनं नेहमीप्रमाणेच ट्विंकलचा विचित्र मेकअप केला. तो फोटो ट्विंकलनं इन्स्टाग्रामवर शेअर करुन मिळालेल्या शिक्षेचा अनुभव सांगितला आहे. “आणखी एक दिवस...आणखी एक मेकओव्हर...होय, दररोज मला ही गोड शिक्षा मिळतेय. मेकअप आर्टिस्ट म्हणून या मुलीचं काहीही भविष्य नाही.” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोवर केली आहे.

अबब... इतक्या पैशांत एखादं घर येईल; प्रियांकाच्या ड्रेसची किंमत ऐकून येईल चक्कर

ट्विंकलचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे रंग लावलेले दिसत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी निताराच्या कृतीचं कौतुक केलंय तर काहींनी ट्विंकलला पुढच्या मेकअपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनामुळं ट्विंकल सध्या आपल्या घरातच मुलांसोबत वेळ व्यतीत करत आहे. शिवाय सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती देखील करण्याचा प्रयत्न करतेय.

First published:

Tags: Akshay Kumar, Twinkle khanna