मुंबई 28 मे : अभिनेत्री आणि त्यांचे महागडे ड्रेस, लुक्स हे काही नवं नाही. अनेकदा या माहगड्या लुक्सची किंमत चक्रावून टाकणारी असते. यात बॉलिवूड किंवा हॉलिवूड कोणत्याच अभिनेत्री मागे नाही. पण बॉलिवूड मधून हॉलिवूड मध्ये आपलं करिअर प्रस्थापित करणारी अभेनत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या महागड्या लूक मुळे चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे याही वेळेस प्रियंकाच्या लूकची मोठी चर्चा होत आहे.
नुकतीच प्रियंकाने बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स (Bilboard Music Awards) या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने पती निक (Nick Jonas) सोबत शो होस्ट देखिल केला होता. पण तिच्या संपूर्ण अवताराची किमंत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. यात सर्वात जास्त चर्चा ठरली आहे ती तिच्या दागिण्यांची. तिने बुलगारी ही एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी परिधान केली होती.
View this post on Instagram
सुंदर हिऱ्यांचे कानातले, ब्रेसलेट, हातात अंगठी असे दागिणे तिने परिधान केले होते. यातील ब्रेसलेटची किंमत ही जवळपास 26,93000 रुपये इतकी आहे. तर हातातील अंगठीची किंमत ही £3730 इतकी आहे म्हणजेच भारतीय रुपयांत 3,84531 रुपये. याशिवाय दुसऱ्या अंगठीची किंमत ही €4700 म्हणजेच 4,19,134 रुपये इतकी आहे. त्यामुळे प्रियंकाने जवळपास एकून 34,96,665 रुपयांचे दागिणे परिधान केले होते. प्रियंकाच्या एका पेजने याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
याशिवाय प्रियंकाने एक मेटालिक गोल्ड बेल्ट तिच्या गाउन वर परिधान केला होता. जो अतिशय महागडा असा बेल्ट होता त्या बेल्टची किंमत 9,47,224 इतकी आहे. यामुळे प्रियंकाचा बेल्ट हा तिच्या लूक मधील सर्वात महागडा ठरत आहे. याशिवाय तिने साजेसे हील्स देखिल परिधान केले होते. त्यांचीही किंमत मोठी आहे. जवळपास 57,586 रुपये इतकी आहे.
प्राजक्ताचं निखळ सौंदर्य; अभिनेत्रीचा मराठमोळा लूक पाहून पडाल प्रेमात
याशिवाय प्रियंकाने महागडे नेलआर्ट ही केलं होतं. ज्याते फोटो तिने स्वतः पोस्ट केले होते. तर प्रियंकाच्या गाउनची किंमत एका वेबसाईच्या वृत्तानुसार 925,186 रुपये इतकी आहे. त्यामुळे प्रियंकाच्या या संपूर्ण लूकची किंमत एखाद्या घराएव्हढी नक्कीच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood, Priyanka chopra