अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्नाने आपल्या करियरमध्ये भलेही काही विशेष मिळवलेलं नसेल, पण लेखिका म्हणून ती नक्कीच यशस्वी ठरली आहे. तिनं तिच्या बॉलिवूड करियरमध्ये तिन्ही खान सोबत काम केलेलं आहे. तसंच तिनं सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार सोबत लग्न केलेलं आहे.
ट्विंकल खन्ना ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिन्ही खानसोबत चित्रपट केले आहेत. आमिर खानसोबतचा 'मेला' असो, शाहरुखसोबतचा 'बादशाहा' असो किंवा सलमानसोबतचा 'जब प्यार किसी से होता है', परंतु त्यातला एकही चित्रपट हिट झालेला नाही.
ट्विंकलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अक्षय कुमारसोबत लग्न करायचं नव्हतं, फक्त अफेअर करायचं होतं. पण चेष्टेनं सुरू झालेल्या अफेअरचं रुपांतर लग्नात झालं.
आज ट्विंकल खन्ना एक लेखिका आहे. ती वर्तमानपत्रात कॉलमही लिहित असते. ट्विटरवर तिचे ट्विटही खूप मजेदार असतात. त्यामुळं तिला कधी कधी ट्रोल देखील केलं जातं. तिला ट्विटरवर 'मिसेस फनीबोन्स' या नावानं ओळखलं जातं.
ट्विंकल खन्ना नेहमीच खूप सुंदर दिसायची आणि आता तिने लेखक आणि निर्माती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
ट्विंकल ने स्वतःची वेबसाइट देखील सुरू केली आहे. आणि ती अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या मुलाखती देखील करते.