• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shocking! या प्रसिद्ध अभिनेत्याच्या नावाचा वापर करून अज्ञाताने मुलींकडे केली न्यूड फोटोंची मागणी

Shocking! या प्रसिद्ध अभिनेत्याच्या नावाचा वापर करून अज्ञाताने मुलींकडे केली न्यूड फोटोंची मागणी

कलाकारांचे जितके चाहते असतात. तितकेच त्यांच्या नावाचे गैरफायदा घेणारे लोकसुद्धा असतात. असाच काहीसा अनुभव आला आहे, टीव्ही सिरीयल (Tv Series) अभिनेता अक्षय खरोडीया (Akshay Kharodia) याला, अक्षय हा ‘पांड्या स्टोर’ (Pnadya Store) या सिरीजमध्ये ‘देव पांड्या’ (Dev Pnadya) ही भूमिका साकारतो.

 • Share this:
  मुंबई, 19 मे: कलाकारांचे जितके चाहते असतात. तितकेच त्यांच्या नावाचे गैरफायदा घेणारे लोकसुद्धा असतात. असाच काहीसा अनुभव आला आहे,  टीव्ही सिरीयल (Tv Series) अभिनेता अक्षय खरोडीया (Akshay Kharodia)  याला, अक्षय हा ‘पांड्या स्टोर’ (Pnadya Store) या सिरीजमध्ये ‘देव पांड्या’ (Dev Pnadya) ही भूमिका साकारतो. अक्षयच्या नावाचा वापर करत एका युजरने मुलींकडून न्यूड फोटोंची मागणी करत, त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे.
  ‘पांड्या स्टोर’ या सिरीजमुळे अक्षयला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. तो सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. मात्र त्याच्या नावाचा वापर करुन जे घडलं ते पाहून त्यालाही धक्का बसला आहे. एक अज्ञात व्यक्ती त्याच्या नावाचा वापर करून, मुलींकडून न्यूड फोटोंची मागणी करत होता. आणि ते फोटो सोशल मीडियावर लिक करण्याची धमकी देऊन त्यांच्या कडून पैसे उकळत होता.
  हा अज्ञात व्यक्ती गेली चार वर्षे हे कारस्थान करत होता. त्याने आत्ता पर्यंत तब्बल 20 ते 25 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. अक्षयने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, की मी चार वर्षांपूर्वी याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. मला असं समजलं, की माझ्या नावावर बरेच फेक आयडी सोशल मीडियावर आहेत. आणि त्यावरून असे काही प्रकार घडत आहेत. (हे वाचा: Happy Birthday:'किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक' रस्किन बॉन्ड यांचा प्रवास ) ‘मला एक नाव समजलं आहे, जो माझ्या नावाचा वापर करून गैरप्रकार करत आहे. ऋत्विक सिंग असं त्याचं नाव आहे. तो अनेक मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, आणि नंतर त्यांच्याकडून न्यूड फोटोंची मागणी करून त्यांना धमकी देतो. आणि त्यांच्या कडून लाखो रुपये घेतो. त्याने आत्तापर्यंत 20 ते 25 लाख रुपये घेतले आहेत’. (हे वाचा:CIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया ) मला अनेक मुलींचे फोन आणि मेल्स येत असतात. मात्र खरी अडचण ही आहे, की माझं अकाऊंट अजून ऑफिशिअल नाही, त्यामुळे अनेकांची गफलत होते. की खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं. या सर्वांमुळे अक्षय खूपचं चिंतेत असून त्याने मुंबई पोलिसांना याबद्दल मदत करण्याचंही आवाहन केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: