मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अन् 'त्या' दिवशी रुबिनानं घेतली कोणत्याही Award शो ला न जाण्याची शपथ; समोर आलं धक्कादायक कारण

अन् 'त्या' दिवशी रुबिनानं घेतली कोणत्याही Award शो ला न जाण्याची शपथ; समोर आलं धक्कादायक कारण

बिग बॉस या रिअलिटी शोच्या 14 व्या सीझनची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तर तिचं फॅन फॉलोइंग अजूनच वाढलं होतं.

बिग बॉस या रिअलिटी शोच्या 14 व्या सीझनची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तर तिचं फॅन फॉलोइंग अजूनच वाढलं होतं.

बिग बॉस या रिअलिटी शोच्या 14 व्या सीझनची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तर तिचं फॅन फॉलोइंग अजूनच वाढलं होतं.

मुंबई, 13 डिसेंबर: बिग बॉस या रिअलिटी शोच्या 14 व्या सीझनची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर तर तिचं फॅन फॉलोइंग अजूनच वाढलं होतं. मात्र, एवढी प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री कोणत्याही अवॉर्ड शोला कधीच उपस्थित राहत (Rubina Dilaik on Award show) नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रुबिना ने यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

रुबिना ने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टींबाबत दिलखुलासपणे चर्चा केली. यात तिने सांगितलं, की एका अवॉर्ड शोमध्ये (Rubina Dilaik award show) तिला बक्षीस मिळणारच अशी खात्री तिला होती. मात्र, तसं न झाल्यामुळे ती खूपच नाराज झाली होती. रुबिना म्हणाली, “त्या वेळी आमचा शो एकदम टॉपला होता. त्याला 5.7 एवढी रेटिंग होती. मला माहिती होतं की मला बेस्ट अक्ट्रेसचा अवॉर्ड मिळणार आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी मी नवीन ड्रेस घेतला होता, केस कर्ल्स केले होते, मेहंदी काढली होती आणि बरंच काही केलं होतं. तुमचं काम कसं आहे हे माहिती असल्यावर अवॉर्ड मिळणारच एवढा विश्वास तर तुम्हाला असतोच.”

पण या शोमध्ये रुबिनाला (Rubina Dilaik instagram) नाही, तर दुसऱ्याच कोणाला तरी बेस्ट अक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. “या अवॉर्ड शोमध्ये मी सर्वात पुढच्या रांगेत बसले होते. पण बेस्ट अक्ट्रेस म्हणून दुसऱ्याच कोणाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी माझ्या भावना आवरू शकले नाही. मी थेट वॉशरुममध्ये (Rubina Dilaik cried in washroom) गेले आणि खूप रडले.” अशा शब्दांमध्ये रुबिना ने तिच्यासोबत झालेला किस्सा सांगितला.

ती पुढे म्हणाली, “दोन दिवसांनंतर मला समजले, की तो पुरस्कार कोणत्या तरी हीरोला देण्यात आला. कारण काही दिवसांनंतरच माझ्या मालिकेत माझ्या बहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री आणि तो हीरो विक्रम फडणीसच्या एका फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी साऊथ आफ्रिकेला जाणार होते. तेव्हा मला समजलं, की दुसऱ्या शोजना सुद्धा ओळख मिळावी यासाठी अवॉर्ड्सना विभागलं गेलं होतं. या पुरस्कारांचा खरंतर कलेशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्यानंतर मी कोणत्याही अवॉर्ड शोला न जाण्याची शपथ घेतली.”

हेही वाचा- घर खरेदी करणाऱ्यांसाठी Good News, 'या' बँकेकडून व्याजदरात घट

अर्थात, यानंतरही रुबिना कित्येक अवॉर्ड शोजमध्ये (Rubina Dilaik in Award shows) दिसून आली होती. याबाबत बोलताना तिने सांगितले, की ती आपल्या मित्रांसाठी, त्यांच्या परफॉर्मन्सेस साठी आणि त्यांच्या शोजसाठी अवॉर्ड शोजला हजेरी लावते. मात्र, तिला जर एखाद्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले असेल, तर त्यात ती सहभागी होत नाही.

रुबिना छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Rubina Dilaik TV Shows) आहे. ‘छोटी बहू’, ‘जीनी और जूजू’, ‘देवों के देव महादेव’ आणि ‘शक्ति’ यांसारख्या कित्येक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

First published:

Tags: Rubina dilaik