मुंबई, 12 मे: कपिल शर्मा (Kapil Sharma) केवळ ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मुळेच चर्चेत असतो असं नाही, सोशल मीडियावर असणारी त्याची उपस्थितीही अनेकदा चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावरही त्याचं जबरदस्त फॉलोइंग आहे. ट्विटरवर तो विशेष सक्रिय आहे. त्याने अनेकदा ट्विटर संदर्भात घडलेले किस्से त्याच्या शोमध्ये शेअर केले आहेत. दरम्यान कपिल शर्माने अलीकडेच जाहीरपणे माफी मागितली आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) ने ट्विटरवर माफी का मागितली असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला असेल. जाणून घ्या नेमकं असं काय घडलं की त्याला सॉरी म्हणावं लागलं. नेमकं काय घडलं? कपिल शर्माला भेटण्यासाठी त्याच्या शोमध्ये दूरदूरवरुन चाहते येत असतात. शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांनाही त्यांना भेटायचे असते. दरम्यान लखनऊमधून अशीच एक व्यक्ती कपिल शर्माला भेटण्यासाठी आली होती, पण त्यांना सेटवर येऊ दिलं आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत ट्वीट केले आहे. त्याने असं म्हटलं आहे की, ‘हाय कपिल शर्मा सर, मी मनिष गुप्ता आहे. मी तुमचं स्केच बनवलं होतं, @akshaykumar सर, @ManushiChhillar मॅम आणि तुमच्या संपूर्ण टीमसाठी. आज ते देण्यासाठी तुमच्या शोमध्ये आलो होतो पण मला परवानगी दिली गेली नाही, मी लखनऊहून आलो होतो.’ हे वाचा- सलमान खानच्या या अभिनेत्रीचं वजन एकेकाळी होतं 113 किलो, झरीन खानची Fat to Fit जर्नी आहे Motivating काय दिलं कपिलने उत्तर? या फॅनचं ट्वीट पाहिल्यानंतर कपिलने माफी मागताना असे लिहिले आहे की, ‘हाय मनिष, या सुंदर स्केचसाठी धन्यवाद आणि जी असुविधा झाली आहे त्यासाठी सॉरी. स्टुडिओ संपूर्ण भरलेला होता. त्यामुळे तुम्हाला परवानगी नाही मिळाली, आणखी केव्हातरी भेटू. खूप सारं प्रेम.’ कपिलने या ट्वीटसह हार्ट आणि हात जोडण्याचा इमोजी देखील पोस्ट केला आहे.
Hi manish, thank you for the beautiful sketch, n sorry for the inconvenience, studio was full that’s why they didn’t allow, see you some other time. Lots of love ❤️🙏 https://t.co/FtC70p8Nz0
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) May 11, 2022
कपिल शर्माच्या या उत्तरामुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान कपिल शर्मा काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ चे प्रमोशन न केल्यामुळे चर्चेत आला होता. सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते.