जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भारती सिंहनंतर आता कपिल शर्माचा नंबर?' सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विचारले सवाल

'भारती सिंहनंतर आता कपिल शर्माचा नंबर?' सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विचारले सवाल

'भारती सिंहनंतर आता कपिल शर्माचा नंबर?' सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विचारले सवाल

ड्रग केसमध्ये (Drug Case) कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) ला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर कपिल शर्मा (Kapil Sharma) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. याप्रकरणात भारतीच्या नवऱ्याला देखील अटक झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये ड्रग प्रकरणांनी (Drug Case) थैमान घातल्यानंतर आता TV कलाकार एनसीबीच्या रडावर आल्याचं दिसतं आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) ला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) ने अटक केल्यानंतर टीव्ही विश्वात मोठी खळबळ माजली आहे. भारतीच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली आहे. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. एकीकडे भारतीच्या अटकेबाबत चाहते धक्क्यामध्ये आहेत तर दुसरीकडे कपिल शर्मा (Kapil Sharma) याचं नाव देखील सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. कपिल शर्माला एनसीबीच्या या कारवाईनंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या मते एनसीबीने भारती सिंहचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. (संबंधित- Drug Case: भारती सिंहनंतर तिच्या पतीलाही अटक,18 तासांच्या चौकशीनंतर NCBची कारवाई ) आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे. यानंतर भारती ट्विटरवर ट्रेंड होत होती, पण तिच्याबरोबर आणि एक नाव ट्रेंड होत होतं आणि ते म्हणजे कपिल शर्मा. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात भारती आणि कपिल एकत्र काम करतात. याचमुळे कपिल शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

जाहिरात
जाहिरात

सोशल मीडियावर नेटकरी असा सवाल करत आहेत की, भारती सिंह नंतर आता कपिल शर्माचा नंबर आहे का?

जाहिरात
जाहिरात

कपिल शर्माचा कॉमेडी शो बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. तसंच भारतीच्या अटकेनंतर तिच्याबाबत देखील कार्यक्रमात बोललं जाणार का जशाप्रकारे इतरांची खिल्ली उडवली गेली? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. दरम्यान भारती आणि हर्ष दोघांच्याही अटकेनंतर टीव्ही विश्वातील आणखी काही नावं एनसीबीच्या हाती लागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात