जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कपिल माझ्या ओठांची उडवायचा खिल्ली, मला वाटायचे वाईट' सुमोना चक्रवर्ती पहिल्यांदाच झाली व्यक्त

'कपिल माझ्या ओठांची उडवायचा खिल्ली, मला वाटायचे वाईट' सुमोना चक्रवर्ती पहिल्यांदाच झाली व्यक्त

सुमोना चक्रवर्ती पहिल्यांदाच झाली व्यक्त

सुमोना चक्रवर्ती पहिल्यांदाच झाली व्यक्त

‘द कपिल शर्मा’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे.या शोमुळे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती घराघरांत लोकप्रिय पोहचली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 19 जुलै- ‘**द कपिल शर्मा’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचा सोशल मीडियावर मोठा चाहचा वर्ग आहे. यातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भऱभरून प्रेम केलं आहे. या शोमुळे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती घराघरांत लोकप्रिय पोहचली. सुमोना या शोमध्ये कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचे पात्र साकारते. शोमध्ये एकदा कपिलने अभिनेत्रीच्या चेहऱ्याची आणि ओठांची खिल्ली उडवली आहे. असं खिल्ली उडवणं सुमोनाला देखील आवडत नव्हतं, यामुळे तिला खूप वाईट वाटायचे, असं तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. शिवाय या अशाप्रकारे खिल्ली उडवण्यामुळे मी रेड लिपस्टिक लावायला देखील घाबरायचे असं देखील तिनं सांगितलं आहे. सुमोना चक्रवर्ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, द कपिल शर्मा शो मध्ये काम करताना सुरुवातीला मला प्रचंड त्रास झाला. कारण, पहिल्याच एपिसोडमध्ये माझ्या चेहऱ्याची चेष्टा करण्यात आली होती. त्यावेळी फारसे कोणी हसले नाही पण, त्यानंतरच्या भागात प्रेक्षक प्रतिसाद देऊ लागले. प्रेक्षक मला हासायचे पण मला त्याचे वाईट वाटायचे सुमोना चक्रवर्तीनं सांगितलं. वाचा- संपल्यात जमा होतं ऋषी कपूरचं करिअर; ना भाऊ ना वडील, ‘या’ सिनेमानं दिली नवसंजीवनी या सगळ्या प्रकाराचा मला त्रास होत होता मग मी हे सगळं अर्चनाला सांगितलं. माझ्या चेहऱ्याची, ओठांची चेष्ठा केल्यामुळे मी अनेकदा एपिसोड सुरु असताना माझे स्क्रिप्ट विसरायचे. मी स्टॅंडअप कॉमेडियन नसल्याने अशाप्रकारे खिल्ली उडवणे मला सहन झाले नाही. त्यानंतर अर्चनाने मला खूप समजावले. त्यांनी मला सांगितले की, तुझ्यासारखे ओठ हवेत म्हणून अनेक महिला प्रचंड पैसे खर्च करतात. त्यांच्या या एका सल्ल्यामुळे मला खूप चांगलं वाटलं.

News18लोकमत
News18लोकमत

सुमोना पुढे म्हणाली की, शोमध्ये झालेल्या चेष्ठेनंतर मी रेड लिपस्टिक लावायला घाबरायचे. महिलांवर कमेंट्स केल्या जातात, खिल्ली उडवली जाते अशा शोमध्ये तू काम करतेस असे प्रश्न अनेकांनी विचारले. पण, हळूहळू परिस्थिती बदलली. बॅकस्टेजला कपिल आणि माझे नाते वेगळे आहे याची जाणीव झाली. स्क्रिप्टचा भाग म्हणून या गोष्टी कराव्या लागतात. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात