आई कुठे काय करते मालिकेतील संजना सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहे. नवीन रील्स, फोटोजमधून ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. दरम्यान या संजनाचे काही दिलखेचक फोटो समोर आले आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी संजना तयार असून स्टार प्रवाह वाहिनीवरील स्टार प्रवाह धुमधडाका 2022 या नववर्ष स्पेशल एपिसोडमध्ये ती परफॉर्म करणार आहे.
या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.
संजनाचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो. या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना पाहता येणार आहे
स्टार प्रवाह धुमधडाका 2022 हा कार्यक्रम रविवार 2 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार असून त्यात संजना परफॉर्म करणार आहे.