मुंबई, 17 जुलै- ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या टीव्ही शोमध्ये लालीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला रतन राजपूत आता टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र रतन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती विविध विषयावर सोशल मीडियावर मत मांडताना दिसते. तिनं खुलासा केला आहे की, ती एकदा एका प्रोजेक्टसाठी ऑडिशनसाठी गेली होती आणि तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. आजच्या तरूणाईला हे कळावं, असं कोणासोबत तरी घडलं आहे, यासाठी मी हे सांगत असल्याचे देखील रतन म्हणाली. सध्या रतन राजपूत तिच्या आईसोबत चंदीगडमध्ये फिरत आहे. तिच्या आईसोबतचा व्हिडिओ तिनं सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. दरम्यान, आज तकला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाला की, अनेक तरुण ज्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते अनेकदा मेसेज करतात आणि मार्गदर्शनासाठी विचारत असतात. म्हणूनच मी याविषयी बोलले. वाचा- ‘गटारी अमावस्येदिवशी सकाळी सकाळी…’ अवधूत गुप्तेच्या पोस्टनं वेधलं लक्ष रतन राजपूतने सांगितले की, ती ओशिवरा येथील एका हॉटेलमध्ये गेली होती, जिथे तिने इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांना देखील पाहिले. त्यावेळी मी माझे ऑडिशन दिले पण दिग्दर्शक तिथे उपस्थित नव्हता. त्यावेळी दिग्दर्शकाच्या कॉर्डिनेटरने माझी ऑडिशन घेतली आणि म्हणाले, ‘मॅडम, तुम्ही खूप छान केले. सर फक्त तुमच्याबद्दल बोलत आहेत. हा रोल तुम्हालचं मिळेल, असं देखील तो म्हणाला. यावर मी देखील ठीक असल्याचे सांगितले.
रचन पुढे म्हणाली की, त्या दिवसात मी कधीच ऑडिशन्ससाठी एकटी गेली नाही आणि जेव्हा ऑडिशन व्हायची तेव्हा माझी एक मैत्रिण सोबत असायची. त्यावेळी मला एक स्क्रिप्ट देण्यात आली आणि मला मीटिंगची तयारी करण्यास सांगितले. पण मला तेव्हा काय होत आहे हेच समजत नव्हते. कोल्ड ड्रिंक घेण्याचा आग्रह केला रतन राजपूतने खुलासा केला की, तिला वेगळ्या हॉटेलमध्ये जायचे होते पण तिच्या होस्टने कोल्ड ड्रिंक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी आम्हाला कोल्ड ड्रिंक दिले आणि ते पिण्याचा आग्रह धरला. इच्छा नसतानाही मीनएक घोट प्यायलो. तेव्हा ते म्हणाले की, मी तुला आणखी एका ऑडिशनसाठी बोलावतो.
आणि मला थोडे अस्वस्थ वाटू लागले रतन राजपूत म्हणाले की, मी आणि माझा मैत्रीण घरी पोहोचलो आणि मला थोडे अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा मला वाटायला लागलं की कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलंय का? काही तासांनंतर मला दुसर्या ऑडिशनसाठी कॉल आला, पण मी गेले नाही, मी त्यांना सांगितले स्क्रिप्ट खराब आहे. तसेच हा वाईट अनुभव सांगतान ती म्हणली की, टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वच लोक वाईट नसतात.