मुंबई, 17 जुलै- मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. आज 17 जुलै रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येला विशेषत: दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. पंचांगानुसार मराठी महिन्यात आषाढी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक जण मांसाहार आणि मद्यपान करतात. त्यामुळे याला गटारी अमावस्या म्हणतात. यानिमित्त गायक अवधूत गुप्ते याने फोटो आणि सोबत पोस्ट देखील शेअर केली आहे. अवधूत गुप्तेनं पोस्ट करत म्हटलं आहे की,आता.. ‘दर्श अमावस्ये‘ (गटारी) दिवशी सकाळ सकाळ खिडकीवर ‘Kingfisher’ च येऊन बसल्यावर माणसानं काय करावं बुवा?!! 😂😂 #आमचंश्रीकृष्णनगर. त्याच्या पोस्टवर कमेटं देखील भन्नाट आल्या आहेत. अवधूत गुप्तेने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्या खिडकीवर एक पक्षी पाहायला मिळत आहे. याला त्याने फारच मजेशीर कॅप्शन दिले आहे. अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने चिअर्स अशी कमेंट केली आहे. तर आदर्श शिंदे, सलील कुलकर्णी या कलाकारांनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, खंड्या पावला समजावा आणि Kingfisher शिंपडावा. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,त्याला आपल्या गटा रीत मध्ये सामील करुन घ्या 😂😂😂 तर एकानं या अमावस्यबद्दल माहिती देणारी कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे की,हा शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे दादा. या अमावस्येला गतहारी अमावस्या म्हणतात. आपल्या संस्कृती मध्ये गटारी वगैरे संकल्पना नाहीयेत 💐..अशा असंख्य कमेंट या पोस्टवर आलेल्या आहेत.