मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनू सूद झाला हतबल; प्रयत्न करूनही नाही वाचवू शकला अभिनेत्रीच्या भावाचे प्राण

सोनू सूद झाला हतबल; प्रयत्न करूनही नाही वाचवू शकला अभिनेत्रीच्या भावाचे प्राण

निक्की तांबोळी(Nikki Tamboli),  पिया बाजपेयी(Pia Bajpei) या अभिनेत्रींच्या भावाचासुद्धा कोरोनाने घेतला आहे बळी

निक्की तांबोळी(Nikki Tamboli), पिया बाजपेयी(Pia Bajpei) या अभिनेत्रींच्या भावाचासुद्धा कोरोनाने घेतला आहे बळी

निक्की तांबोळी(Nikki Tamboli), पिया बाजपेयी(Pia Bajpei) या अभिनेत्रींच्या भावाचासुद्धा कोरोनाने घेतला आहे बळी

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 जून-  देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus 2nd Wave) थैमान घातला आहे. कित्येक लोकांनी यामध्ये आपला जीव गमावला आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे कलाकारांनासुद्धा याचा फटका बसला आहे. यामध्ये कित्येक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. निक्की तांबोळी(Nikki Tamboli),  पिया बाजपेयी(Pia Bajpei) नंतर आत्ता माही वीज (Mahi Vij) या अभिनेत्रीने कोरोनामुळे आपल्या भावाला गमावलं आहे. सोनू सूदने (Sonu Sood) माहीच्या भावाला बेड मिळवून देण्यास मदत केली होती. मात्र तरीसुद्धा त्याला वाचवण्यात अपयश आलं आहे.

नुकताच माही वीजने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दल माहिती दिली आहे. माहीने पोस्ट शेयर करत लिहिलं आहे, ‘भावा मी तुला गमावलं नाही, तर तुला मिळवलं आहे. तू माझी ताकत आहेस. मी आजही तुझ्यावर तितकच प्रेम करते. आणि नेहमीच करत राहीन. जर माझ्या हातात असतं, तर मी ही वेळ मागे घेऊन गेले असते. आणि तुला घट्ट मिठी मारून आमच्यापासून दूर कधीच जाऊ दिलं नसत. मात्र देवाला काही वेगळच हव होतं. बहुतेक आमच्यापेक्षाही जास्त देवाला तू हवाहवासा वाटत होतास. तू नेहमीच माझा हिरो असशील’. अशा आशयाची पोस्ट माहीने लिहिली आहे.

(हे वाचा: आमचं घर आहे संकटात', प्राजक्ता माळीनं चाहत्यांना केली मदतीची विनंती  )

नुकताच सोनू सूदने सुद्धा एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने एका 25 वर्षाच्या मुलाला वाचवू न शकल्याने निराश झाल्याचं सांगितल होतं. आत्ता माहीने सांगितल आहे, की तो मुलगा दुसरा कोणी नसून तिचाच भाऊ होता. माहीने सोनूचे सुद्धा आभार मानले आहेत. आभार व्यक्त करत माहीने म्हटल आहे, ‘जेव्हा मी खचले होते. तेव्हा तुम्ही मला आधार दिला. तुम्ही मला ताकत दिली. मला माहित होतं, माझा भाऊ या अवस्थेवर लवकरच मात करून घरी परतेल मात्र असं नाही झालं. मात्र तुम्ही या काळात केलेल्या मदती आणि आपुलकीबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही जे काम करत आहात खरच ते खुपचं श्रेष्ठ आहे. त्यासाठी तुमचे धन्यवाद’. असं माहीने म्हटलं आहे.

First published:

Tags: Tv actress