मुंबई, 8 जून- मराठी अभिनेत्री(Marathi Actress) प्राजक्ता माळी(Prajakta Mali) जितकी उत्तम कलाकार आहे. तितकीच उत्तम माणूससुद्धा आहे. प्राजक्ता नेहमीच सामाजिक बांधिलकी जपताना दिसून येत. सध्याच्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा ती कार्यरत असल्याच दिसून येत . प्राजक्ताने याच पार्श्वभूमीवर सर्व चाहत्यांना एक विनंती केली आहे. पाहूया प्राजक्ता नेमकं काय म्हणते.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे, ‘मी सर्वांना विनंती करते की “आमचं घर” ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांना या संकट काळी मदत करण्याचे काम करत आहे. तरी “आमचं घर” ला त्यांचे हे समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे.मी माझ्यापरीने एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हां सर्वांना विनंती करते की तुम्ही ही “आमचं घर” ला मदतीचा हात द्या ‘ अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. (हे वाचा: HBD: ‘ते प्रपोजल होतं Shocking, वाचा गश्मीर महाजनीचा भन्नाट किस्सा ) प्राजक्ता अनेक सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेली दिसून येते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. प्राजक्ता सतत सामाजिक विषयांवर बिनधास्त आपलं मत मांडताना दिसून येत. त्यामुळेच ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलीशी वाटते. खूपच कमी वेळात प्राजक्ताने मोठं यश मिळवलं आहे. (हे वाचा: HBD: ‘आणि शाहरुखने केली होती मदत’, शिल्पा शेट्टी झाली भावुक ) झी मराठीरील ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली होती. या पहिल्याच मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर प्राजक्ताने सुवासिनी, जय महाराष्ट्र, महारष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये काम केल आहे. मालिकांबरोबरच प्राजक्ता खो खो, हंपी, डोक्याला शॉट, संघर्ष या चित्रपटांतसुद्धा झळकली आहे. तसेच प्राजक्ता यूटयूबवरून विविध माहिती देणारे व्हिडीओसुद्धा शेयर करत असते.