मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हिना खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळाला, VIDEO शेअर करत म्हणाली...

हिना खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळाला, VIDEO शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर, त्याच्यासह मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री हीना खान हिनेही आपली टेस्ट करून घेतली आणि त्या टेस्टचा रिझल्ट चाहत्यांना सांगण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून लाइव्ह व्हिडिओ प्रसारित केला.

पुढे वाचा ...
  मुंबई, 25मार्च: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याला कोरोनाची लागण झाल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर, त्याच्यासह मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये (Manish Malhotra Lakme Fashion Week) सहभागी झालेली अभिनेत्री हीना खान (Hina Khan) हिनेही आपली टेस्ट करून घेतली आणि त्या टेस्टचा रिझल्ट चाहत्यांना सांगण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून लाइव्ह व्हिडिओ प्रसारित केला. आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह (Corona Negative) आल्याची माहिती तिने या व्हिडिओतून दिली. कार्तिक आर्यन आणि त्याची 'भुलभुलैया टू'मधली सहकलाकार कियारा अडवाणी (Kiara Advani) हे दोघं मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते. तसंच अभिनेत्री हीना खानही तिथे उपस्थित होती. त्यामुळे कार्तिक आर्यनची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी समजताच हिनानेही आपली कोरोना टेस्ट करून घेतली. ती टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तिने बुधवारी (24 मार्च) इन्स्टाग्रामवरून (Instagram) चाहत्यांना दिली.लाइव्ह व्हिडिओमध्ये हीना म्हणाली, 'तुम्हाला माझ्या कोविड टेस्टची (Covid Test) माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ करते आहे. लॅक्मे फॅशन वीकनंतर मी ही टेस्ट केली होती. तुम्ही सगळे जण काळजी करत होतात, हे मला आलेल्या मेसेजेसच्या महापुरावरून मला कळलं. मी मालदीवला जाण्याआधी, तसंच जाऊन आल्यानंतर आणि कार्तिक आर्यनबद्दल कळल्यानंतरही कोरोना टेस्ट करून घेतली. कारण आम्ही सगळे एकत्रच होतो. त्यामुळे मला काळजी वाटत होती. मी तातडीने स्वतःला वेगळं केलं आणि माझ्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी अगदी ठणठणीत आहे.'
  View this post on Instagram

  A post shared by HK (@realhinakhan)

  (हे वाचा:  आमिर खान पाठोपाठ आणखी एक 'Idiot' स्टारला Virus ने घेरलं, तरी म्हणतो All is Well ) तब्येत बरी असली, तरी सावधगिरीचा उपाय म्हणून आणखी दोन दिवस आपण विलगीकरणातच राहणार असल्याचंही हीनाने स्पष्ट केलं. हीनाने मुंबईतल्या वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबद्दलही चिंता व्यक्त केली. 'मुंबईतली स्थिती खूपच चिंताजनक आहे. माझ्या आई-वडिलांना मी 'अजिबात घराबाहेर पडू नका' असं सांगितलं आहे. मीही काळजी घेत आहे,' असं हीनाने सांगितलं. 'मी लवकरच अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे,' असंही हीनाने व्हिडिओच्या शेवटी सांगितलं.
  First published:

  Tags: Hina khan, Tv actress

  पुढील बातम्या