जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर खान पाठोपाठ आणखी एक 'Idiot' स्टारला Virus ने घेरलं, तरी म्हणतो All is Well

आमिर खान पाठोपाठ आणखी एक 'Idiot' स्टारला Virus ने घेरलं, तरी म्हणतो All is Well

आमिर खान पाठोपाठ आणखी एक 'Idiot' स्टारला Virus ने घेरलं, तरी म्हणतो All is Well

3 इडियट्स या आमिरच्या गाजलेल्या सिनेमातल्या त्याच्या मित्राला अखेर ‘व्हायरस’ने घेरलं. 3 Idiots चे फॅन असाल तर त्याने ही Coronavirus positive असल्याची बातमी कशी जाहीर केली आहे वाचाच! All is well म्हणणाऱ्या या कलाकाराला तुम्हीही द्याल दाद!

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना बॉलिवूडमधील अभिनेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. अभिनेता अमिर खान (Amir khan covid-19 positive) याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता 3 इडियट्स (3 idiots) चित्रपटातील त्याचा सहकलाकार असलेल्या आर. माधवन यालाही (R Madhavan coronavirus positive) कोरोनाची लागण झाली आहे. आर. माधवनने 3 इडियट्स चित्रपटातील अमिर खान आणि त्याचा फोटो असलेलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याने स्वतःला कोरोना झाल्याची बातमी ट्वीट करत दिली आहे. पण त्याने 3 इडियट्सचा फोटो ट्वीट करत आणि ऑल इज वेल सांगत अशा शब्दांत ही बातमी दिली आहे की, तुम्हीही या स्टारला मनापासून दाद द्याल. या सिनेमाचे फॅन्स असणाऱ्यांना माधनने लिहिलेलं ट्वीट कळेल. सिनेमातल्याच डायलॉग्ज आणि कॅरेक्टर्सचा संदर्भ देत त्यानं Covid positive असल्याचं सांगितलं आहे. माधवन लिहितो, ‘फरहानला रॅन्चोला फॉलो करायचं होतं आणि व्हायरस त्यांना फॉलो करत होता. अखेर व्हायरसने त्यांना पकडलंच. सध्या ऑल इज वेल आहे आणि कोरोना लवकरच खड्ड्यात जाईल. आमच्या मागे आता राजू या कोरोनाच्या विळख्यात सापडू नये अशी प्रार्थना करू या. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. लवकरच बरा होईन’ असा मजकूर आर. माधवन याने लिहिला आहे. https://twitter.com/ActorMadhavan/status/1374984964467384320 2009 साली रिलीज झालेला 3 इडियट्स चित्रपट चांगलाच गाजला होता आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. 3 इडियट्स या चित्रपटात आमिर खान याने रॅन्चोची भूमिका साकरली होती. तर आर माधवन हा फरहानच्या आणि शरमन जोशीने राजू रस्तोगीच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील भूमिकेचं वर्णन करत आर. माधवनने ट्विट केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात