मुंबई, 14 मे- मागच्या काही दिवसात अनेक सेलेब्सच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे. टीव्ही अभिनेत्री गौहर खान आणि नेहा मर्दा हिनं देखील मुलाला जन्म दिला आहे. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीची खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ‘लगी तुझसे लगान’, ‘डायन’, ‘कुसुम’ आणि ‘नागिन’ यांसारख्या हिट मालिकांमध्ये झळकलेल्या आशका गोराडिया हिनं गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे, तीही अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये. होय, आशका लवकरच आई होणार आहे आणि, तिने ही गुडन्यूज शेअर करण्यासाठी ‘मदर्स डे’चा दिवस निवडला आहे. 37 वर्षीय अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, लवकरच तिचा ‘बीच बेबी’ या जगात येणार आहे. हा मदर्स डे आणखी खास झालाय! या नोव्हेंबरमध्ये आमचे कुटुंब आणि आमची एक वेगळी प्रॅक्टिस होईल. आम्ही आमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रवासाला सुरुवात करत असताना तुमचे प्रेमळ संदेश आम्हाला पाठवा!" बीच बेबी मार्गावर आहे! #parentstobe. वाचा- मुलाचा अभिनय पाहून सुपरस्टार वडिलांचं फिरलं डोकं; सगळ्यांसमोरच केलं असं काही आशकाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत भावी आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या 6 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई बनणार आहे, त्यामुळे तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी एक खास मार्ग निवडला. अभिनेत्री नोव्हेंबर 2023 मध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे, त्यामुळे ती अत्यंत आनंदी आहे.
आशकाच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी बॉलिवूड लाईफशी बोलताना आशकाने मातृत्वाविषयी खुलासा केला होता. यावेळी अभिनेत्रीने सांगितले होते की, तिच्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत आणि ते आता आई होण्यास तयार आहेत. आयुष्याचा हा टप्पा तिला मोकळेपणाने जगायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. मातृत्वाचा काळ हा सर्वात आनंदाचा काळ असल्याचे तिनं सांगितलं होतं.
एकता कपूरच्या ‘कुसुम’ या मालिकेत आशका गोराडिया कुमुदच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेमुळं तिला एक वेगळी ओळख मिळाली. कुसुमच्या मुलीची भूमिका तिनं या मालिकेत साकारली होती. ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दिली आहे.