Home /News /entertainment /

पतीला निरोप देताना अभिनेत्री झाली भावूक; दिव्यांकाला एअरपोर्टवरच कोसळलं रडू

पतीला निरोप देताना अभिनेत्री झाली भावूक; दिव्यांकाला एअरपोर्टवरच कोसळलं रडू

टिव्हीचा प्रसिद्ध स्टंट शो ‘खतरों को खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं शुटींग हे साउथ अफ्रिकेतील केप टाउन (Cape town) इथे होणार आहे. पण यामुळेच दिव्यांकाला पतीला सोडून शुटींग साठी जाव लागत आहे. आणि त्यामुळे ती भावूक झाली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 8 मे : छोट्या पडद्याची क्वीन दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) सध्या तिच्या आगामी शो मुळे चर्चेत आहे. पण त्यासाठीच एअरपोर्टवर पतीला निरोप देतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दिव्यांकाला पतीला सोडून शुटींग साठी जाव लागत आहे. आणि त्यामुळे ती भावूक झाली आहे. टिव्हीचा प्रसिद्ध स्टंट शो ‘खतरों को खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi)  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं शुटींग हे साउथ अफ्रिकेतील केप टाउन (Cape town) इथे होणार आहे.  तर 7 मे च्या मध्यरात्रीच सगळेच स्पर्धक हे केप टाउन साठी रवाना झाले आहेत.  यावेळी टिव्हीची सोज्वळ सून म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीही या शो मध्ये दिसणार आहे.

  “नाचणारी, ठुमके मारणारी... काय काय बोलायचे लोक”, सपना चौधरीनं सांगितला 13 वर्षातील संघर्ष

  सगळेच स्पर्धक एकाच वेळी एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळा त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबिय देखिल आले होते. दिव्यांका सोबत तिचा पती विवेक दहिया (Vivek Dahiya) ही आला होता. पण त्याला निरोप देताना दिव्यांकाला अश्रु अनावर झाले. त्यांचा हा व्हिडीओ दिव्यांच्या च्या चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसतोय. तर विवेक तिला समजावत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  यानंतर विवेकने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दिव्यांकाप्रती प्रेमही व्यक्त केलं आहे. दिव्यांका आणि विवेक ने 2016 साली विवाह केला होता. टिव्हीचं ते एक प्रसिद्ध कपल आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Vivek Dahiya (@vivekdahiya)

  ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये अन्य स्पर्धकांचेही जवळचे लोक त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. बिगबॉस फेम अभिनेता राहूल वैद्य (Rahul Vaidya)  सोबत गर्लफ्रेंड दिशा परमार आली होती. ती देखिल भावूक होताना दिसली. यानंतर रोडीज फेम अभिनेता वरुण सूद (Varun Sood) सोबत गर्लफ्रेंड दिव्या अग्रवाल आली होती. त्याचाही भावूक निरोपसमारंभ एअरपोर्टवर पहायला मिळाला.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Television show

  पुढील बातम्या