Home /News /entertainment /

अंकिता लोखंडेने 'क्यूंकी सास भी बहू थी' स्टाईलमध्ये शेअर केला VIDEO; दाखवली नव्या घराची पहिली झलक

अंकिता लोखंडेने 'क्यूंकी सास भी बहू थी' स्टाईलमध्ये शेअर केला VIDEO; दाखवली नव्या घराची पहिली झलक

छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी (TV Actress) एक अशी अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) ओळख आहे. अंकिता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

  मुंबई, 1 जुलै-   छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी (TV Actress) एक अशी अंकिता लोखंडेची  (Ankita Lokhande) ओळख आहे. अंकिता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजही असंच काहीसं झालं आहे. अंकिता लोखंडेने चाहत्यांना टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'क्यूंकी सास भी बहू थी' ची आठवण करून दिली आहे. अंकिताने एकता कपूरच्या या मालिकेच्या स्टाईलमधील एक व्हिडीओ पुन्हा तयार तयार करत तुलसी विराणीच्या अंदाजात तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वास्तविक अभिनेत्रीने यातून आपल्या नव्या घराची झलक (Ankita Lokhande & Vicky Jain New Home) दाखवली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या नव्या घरात प्रवेश करताना एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये 'क्यूंकी सास भी बहू थी'च्या स्टाईलमध्ये ती तिच्या घरातील प्रत्येक सदस्याला भेटवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिताने स्मृती इराणी यांची हुबेहूब कॉपी केली आहे. ज्या पद्धतीने तुलसी विराणी मालिकेच्या सुरुवातीला घराचा दरवाजा उघडून प्रत्येक सदस्याची ओळख करून देत होती, त्याच पद्धतीने अंकिताही नवरा, सासू, सासरा, दीर,जाऊ यांची ओळख करून दिली आहे. सोबतच आपल्या नवा घराची झलकही दाखवली आहे.
  (हे वाचा: तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यावर भडकला करण कुंद्रा;'तो' मेसेज ठरला कारणीभूत ) अंकिता आणि विकीने नुकतंच मुंबईत एक नवं घर खरेदी केलं आहे. हे घर अतिशय आलिशान आहे. घरात पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश झाल्यानंतर अंकिताने आपल्या सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींसाठी एक खास पार्टी ठेवली होती. यामध्ये राहुल वैद्य, दिशा परमार,अली गोनी, पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार यांच्यासोबत अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व सेलेब्रेटींनी आपल्या सोशल मीडियावर अंकिताच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अंकिता आणि विकीच्या घराची वाहवाह केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Entertainment

  पुढील बातम्या