जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तारक मेहता..'मध्ये दयाबेनची एन्ट्री कन्फर्म; टिव्हीवरील ही प्रसिद्ध सून घेऊ शकते दिशा वकानीची जागा

'तारक मेहता..'मध्ये दयाबेनची एन्ट्री कन्फर्म; टिव्हीवरील ही प्रसिद्ध सून घेऊ शकते दिशा वकानीची जागा

'तारक मेहता..'मध्ये दयाबेनची एन्ट्री कन्फर्म; टिव्हीवरील ही प्रसिद्ध सून घेऊ शकते दिशा वकानीची जागा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शो संबंधी अनेक अपडेट्स समोर येत असतात. कधी शोमधील नवीन एंट्रीबद्दल तर कधी शो सोडणाऱ्या अभिनेत्याबद्दल. प्रेक्षक दयाबेनच्या (Dayaben) व्यक्तिरेखेला खूप मिस करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,9  जुलै-   ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  हा शो गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शो संबंधी अनेक अपडेट्स समोर येत असतात. कधी शोमधील नवीन एंट्रीबद्दल तर कधी शो सोडणाऱ्या अभिनेत्याबद्दल. प्रेक्षक दयाबेनच्या (Dayaben) व्यक्तिरेखेला खूप मिस करत आहेत आणि दिशा वकानी (Disha Vakani) परत येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता दिशाच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपुष्ठात आल्या आहेत. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दयाबेन पुनरागमन करत आहे.मीडिया रिपोर्टनुसार टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानीची जागा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी नुकतंच सांगितलं होतं की, दयाबेनच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. त्यासाठी ऑडिशन्सही घेण्यात आल्या आहेत. झूम टीव्हीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या सखुजाचे नाव शॉर्टलिस्टमध्ये सर्वात वर आहे. दयाबेनच्या लुक टेस्टमध्ये तिला पसंती मिळाली असल्याचं सांगितलं जात आहे.

News18

या मालिकेत दयाबेन हे पात्र सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मात्र दयाबेनच शोमधून गायब असल्याने प्रेक्षक नाराज होते. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांची मागणी पाहून शोचे निर्मातेही नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. आता ऐश्वर्या सखुजा नव्या दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहे. असं झालं तर बऱ्याच दिवसांनी प्रेक्षक दयाबेनला पाहणार आहेत. मात्र याविषयी ऐश्वर्या किंवा निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.ऐश्वर्याने ‘सास बिना ससूराल’ मध्ये काम केलं आहे. **(हे वाचा:** Payal-Sangram Wedding: पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग; सेलेब्रिटी कपलच्या मेहंदी-संगीताचे PHOTO ) नुकतंच या तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून निरोप घेतला होता. ते सध्या दुसऱ्या एका शोमध्ये दिसत आहेत. याशिवाय टप्पूची भूमिका साकारणारा राज अनदकतही शोमध्ये दिसत नाहीये. त्यानेसुद्धा शो सोडल्याचा काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं. प्रदीर्घ काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या शोमध्ये नवे चेहरे कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील, हे त्यांच्या एंट्रीनंतरच कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात