
'लॉकअप' (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Payal Rohtagi & Sangram Singh) उद्या लग्नगाठ बांधणार (Wedding) आहेत.

तत्पूर्वी या दोघांच्या मेहंदी आणि संगीताचे फोटो समोर आले आहेत. फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोबत पायलने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री लेहेंग्यामध्ये तर संग्राम कुर्ता पायजमामध्ये एकदम ट्रॅडिशनल दिसून येत आहेत .

सेलिब्रेटी कपल उद्या म्हणजेच 9 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये लग्नापुर्वीच्या सर्व विधी पार पडणार आहेत.

याबाबत बोलताना संग्राम आणि पायलने म्हटलं होतं, '' मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. आग्रा या शहराला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. यानंतर आम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित करू, यासोबतच हरियाणातील लोकांना मिठाई आणि लाडू देखील पाठवण्यात येणार आहेत''.




