मुंबई, 25 डिसेंबर- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील ‘जुनी सोनू’ (Old Sonu) म्हणजेच निधी भानुशालीनं (Nidhi Bhanushali Boyfreind) अखेर तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचं नाव उघड केलं आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की ती ऋषी अरोरा (Rishi Arora) नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. निधी भानुशालीनं एकेकाळी TMKOC मध्ये सोनूची भूमिका साकारली होती. तिनं तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हा लोकप्रिय टीव्ही शो सोडला. पण, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि सतत तिच्या व्हेकेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. निधीनं नुकताच तिचा बॉयफ्रेंड ऋषीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं तिच्या चाहत्यांना तिच्या ट्रॅव्हल्स संबंधित प्रश्न विचारण्यास सांगितलं आहे. आता ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, निधीनं खुलासा केला की तिला आणि ऋषी दोघांनाही ट्रॅव्हलिंग करायला प्रचंड आवडतं. आणि सहसा ते त्यांच्या कारमधून त्यांच्या पाळीव कुत्र्यासह एकत्र ट्रॅव्हल्स करतात.
निधी म्हणाली, “माझ्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून ट्रॅव्हल्सचा एक किडा आहे.” ऋषीसोबतच्या तिच्या सध्याच्या रोड ट्रिपबद्दल बोलताना तिनं सांगितलं की, त्यांनी एकत्र महाराष्ट्र, लडाख आणि नंतर जम्मू आणि काश्मीरच्या आसपासच्या अनेक भागांना भेटी दिल्या आहेत.निधीनं सांगितलं की या प्रवासादरम्यान दोघेही अनेकदा टेन्टमध्ये राहिले आहेत.व्हेकेशन दरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या बिकिनी फोटोंबद्दल बोलताना निधी म्हणते की, तिच्या पालकांनी तिला पाठिंबा दिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल ती कृतज्ञ आहे. दुसरीकडे, ट्रोल्सबाबत निधीनं म्हटलं की, एखाद्या अंधाऱ्या खोलीत कॅम्प्युटरच्या मागे बसलेल्या लोकांची मला पर्वा नाही. (हे वाचा: VIDEO: कपिल शर्माने स्वतःला म्हटलं गरीब; तर शाहिद कपूरने दिलं कडक उत्तर ) याशिवाय निधी भानुशालीनं तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये ‘टप्पू’ ची भूमिका करणाऱ्या तिच्या सहकलाकार भव्या गांधीला डेट केल्याच्या बातम्यांवरही प्रतिक्रिया दिली. निधीनं भव्य गांधीसोबत डेट केल्याच्या बातम्या फेटाळून लावत आणि आपण एक चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. निधीनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या विनोदी मालिकेत भिडे गुरुजी आणि माधवी यांची मुलगी सोनूची भूमिका साकारली होती.