मुंबई 2 सप्टेंबर : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाच (Sidharth Shukla) आज सकाळी निधन झालं. बातमी समजताच त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान सिद्धार्थ विषयी आणखी काही माहिती समोर येत आहे. सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही गोळ्यांच सेवन केलं होतं अशी माहितीही समोर येत आहे. कूपर रुग्णालयात त्याला हृदय विकाराच्या झटक्याने मृत घोषित केलं. मात्र सिद्धार्थने रात्री सेवन केलेल्या गोळ्यांनंतर सकाळी तो उठूच शकला नाही. तर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं.
कूपर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ ला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सिद्धार्थने नक्की कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कूपर रुग्णलयात सिद्धार्थचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. तर पोस्टमोर्टेम ही केलं जाणार आहे. (Sidharth Shukla Death)
टीव्ही चा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 चा तो विजेता ठरला होता. त्यानंतर त्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. बालिका वधू, बाबुल का अंगण छुटे ना अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तो दिसला. पण बिग बॉस नंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी भर पडली. अभिनेत्री शेहनाझ गील सोबत त्याची केमिस्ट्री सुपरहिट ठरली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर संपूर्ण सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याच अकाली जाणं अनेकांच्या जिव्हारी लागल आहे. बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीकडून आणि त्याच्या लाखो चाहत्यांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.